BJP office bearers attending the BJP booth empowerment meeting esakal
नाशिक

BJP News : बावनकुळे यांच्या कौतुकाने शहराध्यक्ष निवडीत ट्विस्ट; भाजपा बूथ सशक्तीकरण आढावा बैठक

सकाळ वृत्तसेवा

BJP News : भाजपच्या बूथ सशक्तीकरण आढावा बैठकीत धनंजय माने यांनी बूथ सशक्तीकरण कामाचा आढावा सादर करून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पाठीवर थाप मिळवली.

एवढेच नाही तर माने यांच्यासारखे काम प्रत्येकाने केल्यास पक्ष संघटन वाढीला बळ मिळेल, असेदेखील बावनकुळे यांनी सांगितले. आपल्या पाऊण तासाच्या भाषणांत त्यांनी तब्बल दहा ते बारा वेळा माने यांचे नाव घेत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना उदाहरण दिल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. (twist in election of city president with praise of Bawankule BJP booth empowerment review meeting nashik news)

सध्याचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्या पदाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. तसेच त्यांच्याबद्दल पक्षांतर्गत विरोधकांचा गटही सक्रिय झाला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी नव्या सक्षम शहराध्यक्षाचा शोध पक्षाकडून घेतला जात आहे.

त्यातच झालेल्या बूथ सशक्तीकरण आढावा बैठकीत खुद्द प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी धनंजय माने यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केल्याने भाजपमध्ये अंतर्गत चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्षांकडून कौतुकाचा वर्षाव झाल्याने माने हे आता थेट भाजपच्या शहराध्यक्ष पदाच्या रेसमध्ये पोचले आहेत.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

माने थेट शहराध्यक्षपदाच्या रेसमध्ये...

भाजपमध्ये सध्या नाशिक शहराध्यक्ष बदलाचे वारे वाहत आहे. शहराध्यक्षपद आपल्या पदरात पडावे, यासाठी अनेकांनी पक्षातील वरिष्ठांकडे लॉबिंग सुरू केली आहे. संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते, अनिल भालेराव, सुनील केदार, नाना शिलेदार, जगदीश पाटील,

अजिंक्य साने, संभाजी मोरुस्कर, उत्तम उगले सह अजून काही मंडळींची नावे चर्चेत आहे. त्यातच खुद्द प्रदेशाध्यक्षांकडून माने यांचे कौतुक झाल्याने माने यांच्या रूपाने नवीन आणखी एका नावाची भर पडली असून, शहराध्यक्ष निवड प्रक्रियेत ट्विस्ट आला आहे.

"गेल्या २०-२२ वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करत आलो आहे. कोरोनाकाळात मतदारसंघापुरता काम न करता शहरातील सर्व जनतेसाठी काम केले. महापालिकेत पत्नी नगरसेविका असल्याने तिच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी बांधील राहील."

- धनंजय माने, माजी शहराध्यक्ष, भटक्या विमुक्त आघाडी, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT