Bribe Crime esakal
नाशिक

Breaking News: नाशिकमध्ये ACB च्या गळाला मोठा मासा अडकला; सहाय्यक निबंधकाला 20 लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज गेल्या काही वर्षातील मोठी कारवाई केली असून तालुका सहायक निबंधकास तब्बल २० लाखाची लाच घेताना आज (ता.२९) रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे, या लाचखोरीत तालुका निबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपीकाचाही सहभाग होता.

त्यामुळे सहायक निबंधकासह वरिष्ठ लिपिकाला एसीबीच्या पथकाने रात्री उशिरा ताब्यात घेतले. (Two arrested along with assistant registrar while accepting bribe of 20 lakhs Nashik Bribe Crime news)

‘एसीबी’ तील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाचखोर सहाय्यक निबंधकाचे नाव रणजित पाटील असे आहे. सावकारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल न करण्यासाठी पाटील याने २० लाख रुपयांची लाच मागितली होती. या सर्व प्रकारात वरिष्ठ लिपिक प्रवीण अर्जुन विरनारायण याचाही सहभाग होता. या संदर्भात एसीबीकडे तक्रार आली.

त्यानंतर एसीबीच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज रात्री सापळा रचला. सापळ्यात लाचखोर निबंधक पाटील आणि लिपिक वीरनारायण यांना २० लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. कारवाईनंतर एसीबीच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

नाशिक शहरात खासगी सावकारीने उच्छाद मांडला आहे. सावकाराच्या जाचाला कंटाळून सातपूरच्या अशोक नगर परिसरातील एकाच कुटुंबातील तिघांनी आपले जीवन संपविले आहे. त्यानंतर पोलिसांनी तब्बल २० सावकारांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

तसेच सहकार विभागानेही सावकारांविरुद्ध मोहिम उघडली आहे. आता या मोहिमेअंतर्गतच कारवाई न करण्यासाठी तब्बल २० लाख रुपयांची लाच घेताना तालुका सहाय्यक निबंधक व वरिष्ठ लिपिक जाळ्यात अडकले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT