crime news  sakal
नाशिक

Nashik Crime : अहमदाबाद येथील व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या दोघांना अटक; चौघे फरार

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : अहमदाबाद येथील व्यापाऱ्याला कॉपर स्क्रॅबचे रॉ मटेरियल देतो असे सांगून त्याला धुळे येथे बोलावत अपहरण करून भारदेनगर (ता. मालेगाव) येथील जंगलात नेले. सोमवारी हा प्रकार घडला. व्यापाऱ्याला मारहाण व खंडणी मागणाऱ्या दोघा जणांना तालुका पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे संशयितांनी खंडणीपोटी तीन लाखांपैकी सव्वादोन लाख रुपये ऑनलाइन मागविले. व्यापाऱ्याच्या खिशातील चार हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले. या प्रकरणातील चौघे संशयित फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. (Two arrested for abducting businessman from Ahmedabad Four absconding jalgaon Latest Crime News)

अहमदाबाद येथील व्यापारी मुरली रघुराज भंडारी (वय २४, रा. मंगल रेसिडेन्सी, असर्वा, अहमदाबाद) याला दादाराम भोसले व त्याच्या सहकाऱ्यांनी कॉपर स्क्रॅब मटेरिअल देण्याच्या बहाण्याने धुळे येथे बोलाविले. त्यानंतर त्याला दुचाकीने भारदेनगर येथील जंगलात नेऊन त्याला मारहाण, दमबाजी करत खंडणीसाठी अपहरण केले. यानंतर त्याला शोधण्यासाठी संशयितांनी वडिलांकडून तीन लाखाची मागणी केली. मुरलीचे वडील रघुराज यांनी मित्रांकडून व स्वत: रक्कम जमा करून सव्वादोन लाख रुपये ऑनलाइन संशयितांना पाठविले. संबंधितांनी मुरलीजवळील खिशातील चार हजार रुपयेही जबरदस्तीने हिसकावून घेतले.

सुटका झाल्यानंतर मुरलीने तालुका पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. गुन्ह्याचा प्रकार लक्षात घेता उपअधीक्षक पुष्पराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हेमंत पाटील, देवेंद्र शिंदे, उपनिरीक्षक एस. डी. कोळी व सहकाऱ्यांनी तपास चक्रे फिरवून दादाराम भोसले (वय ३६), बबलू ऊर्फ छोटू चव्हाण (वय २८, दोघे रा. हेकळवाडी, ता. जि. धुळे) या दोघांना मंगळवारी पहाटे अटक केली. हेकळवाडी येथीलच श्यामलाल पवार, लुकड्या चव्हाण, मुन्ना भोसले, रामदास पवार हे अन्य चार संशयित फरार आहेत. तालुका पोलिस ठाण्यात या सहा संशयितांविरुद्ध दरोडा, अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: उड्डाणादरम्यान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड, विमानतळावरच अडकून पडले!

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

SCROLL FOR NEXT