Funding esakal
नाशिक

Nashik News: पिंपळगाव-चंडीकापूर रस्ता दुरुस्तीसाठी अडीच कोटी

सकाळ वृत्तसेवा

वणी : आद्य स्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंगी गड व सप्तशृंगीमातेचे मुळ रूप समजले जाणाऱ्या वणीच्या श्री जगदंबामाता मंदिराचा पदयात्रेचा मार्ग असलेला पिंपळगाव चौफुली ते चंडीकापूर (पारखमळा) या रस्त्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या प्रयत्नातून २.५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

त्यातून २० वर्षांपासून दुरवस्था झालेेेेेल्या रस्त्याची दुरुस्ती होणार असल्याने भाविकांची पदयात्रा व शेतकरी बांधवाचे दळवळण सुखकर होणार आहे. (two half crores for repair of Pimpalgaon Chandikapur road Nashik News)

सप्तशृंगी गड व वणी येथे वर्षभरात नाशिक, पिंपळगाव बसवंत, चांदवड, पेठ, गुजरात राज्याकडून हजारो भाविक पदयात्रेेने येेत असतात. वणीच्या जगदंबेचे दर्शन घेऊन पदयात्रेकरू गडावर चंडीकापूरमार्गे साठ पायऱ्या (रडतोंडी) या मार्गाने गडावर जातात.

मात्र, वणी ते चंडीकापूर मार्गाची २० वर्षांपासून दुरवस्था झाली होती. याबाबत भाविकांसह शेतकऱ्यांची वाहतुकीसाठी मोठी अडचण होती. पावसाळ्यात या रस्तावरून चालणेही मुश्किल होते.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे भाविक व शेतकऱ्यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

तसेच भाजपचे कुंदन जावरे, महेंंद्र पारख आदी पदाधिकाऱ्यांनीही पाठपुरावा केल्याने येथील पिंपळगाव बसवंत ते चंडीकापूर (पारख मळा) या साडेचार किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या दुरुस्तीस अडीच कोटी रुपये राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत मंजूर झाले आहेत, तसेच वणी येथील संस्कृतीनगर ते औताळे रस्त्याच्या कामासाठी १.२५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

रस्त्याचे काम करताना ग्रामपंचायतीने जलवाहिन्या व भूमिगत गटारीचे कामे करावीत. जेणेकरुन केलेला रस्ता परत खोदला जाणार नाही, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

Maratha Reservation: सरकारमुळेच माझ्या मुलाचा जीव गेला; आरक्षणासाठी जीव देणाऱ्या प्रतिकच्या आईचा जरांगेंसमोर टाहो

A Unique Hat trick: ऑस्ट्रेलियन फिरकीपटूची अनोखी हॅटट्रिक; ३६ वर्षांपूर्वी कर्टनी वॉल्श यांनी केली होती अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT