The subject goods seized in the crime of highway robbery. including the local crime branch team esakal
नाशिक

Nashik Crime: महामार्गावर लुटमार करणाऱ्या दोघांना नाशिकमधून अटक; रात्रीच्या वेळी कोयत्याचा धाक दाखवून करायचे लुट

कोयत्याचा धाक दाखवून किंमती ऐवज बळजबरी हिसकावून नेणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुंबई - आग्रा महामार्गावर प्रवाशांच्या कारची तोडफोड करून कोयत्याचा धाक दाखवून किंमती ऐवज बळजबरी हिसकावून नेणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

याप्रकरणी घोटी पोलिसात गुन्हा दाखल आहे. तर संशयिताचा तिसरा साथीदार भद्रकालीतील गावठी पिस्तुल बाळगल्याप्रकरणी सध्या मध्यवर्ती कारागृहात दाखल आहे. (Two highway robbers arrested from Nashik Looting at night by showing fear of coyotes Nashik Crime)

तौसिफ लुकमान पठाण उर्फ गफुर बस्ती, (३०, रा. नानावली, मानुर रोड), प्रविण उर्फ चाफा निंबानी काळे (२४, रा. आम्रपाली झोपडपट्टी, कॅनॉल रोड, उपनगर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून, मोहम्मद अन्वर सय्यद (रा. स्वामी समर्थ हौसिंग सोसायटी, नानावली, जुने नाशिक) हा सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दाखल आहे.

स्थानिक गुन्हेशाखेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १ जानेवारीला महामार्गावरील मुंढेगाव शिवारात किरण कावळे (रा. ठाणे) हे त्यांच्या मित्रांसह रस्त्यालगत रात्रीच्या वेळी थांबले होते.

त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या संशयित तिघांनी त्यांच्या कारची काच फोडून कोयत्याचा धाक दाखविला आणि किरण व त्यांच्या मित्रांकडील सोन्याच्या चैन, मोबाईल व रोकड असा ७० हजार ५७० रुपयांचा ऐवज लुटून नेला होता.

याप्रकरणी घोटी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. याचप्रमाणे, गेल्या १३ जानेवारीला वाडिवऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत नवीनकुमार जैन (रा. मुंबई) यांच्याही कारची काच फोडून शस्त्रांचा धाक दाखवून ८२ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला होता.

या लुटमारीच्या गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हेशाखेचे पथक करीत असताना, गुन्हेगारांच्या गुन्हे करण्याच्या पद्धती व गोपनीय माहितीच्या आधारे संशयित तौसिफ व प्रवीण या दोघांना ग्रामीण पोलीसांनी जुने नाशिकमधून अटक केली.

चौकशीत संशयितांनी तिसरा साथीदार मोहम्मद याच्या मदतीने लुटमार केल्याची कबुली दिली. संशयितांकडून ९ मोबाईल, सोन्याची चैन व दुचाकी असा ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या नाशिकमधील भद्रकाली पोलीसात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सहायक निरीक्षक गणेश शिंदे, हवालदार नवनाथ सानप, नाइक विश्वनाथ काकड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, मनोज सानप, भुषण रानडे यांच्या पथकाने बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: आज शेअर बाजार बंद राहणार; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही व्यवहार होणार नाही

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीचा भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

IND vs AUS : लागली वाट! सर्फराजनंतर सराव सामन्यात आणखी एका प्रमुख फलंदाजाला दुखापत, विराट कोहली तर...

Sweet Potato Patties: सकाळी नाश्त्यात बनवा चटपटीत रताळं पॅटिस, जाणून घ्या रेसिपी

Congress : समाजात फूट पाडण्यासाठीच भाजपने कलम 370 चा मुद्दा जिवंत ठेवलाय, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT