Two suspects arrested while selling MD. Along with the Assistant Commissioner of Crime Branch Dr. Sitaram Kolhe, Unit One Police Inspector Vijay Dhamal, Anti Narcotics Squad Police Inspector Pankaj Bhalerao and the team esakal
नाशिक

Nashik MD Drug Case: ‘एमडी’ विक्री करताना आणखी दोघे सापडले! सोशल मीडियावर केला होता व्हिडिओ व्हायरल

काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर धावत्या वाहनात एमडी पुडीचा व्हिडिओ व्हायरल करीत पोलिसांना आव्हान देणाऱ्या दोघांना अखेर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सामनगाव, शिंदेगाव, वडाळागाव एमडी प्रकरणाचा धुराळा खाली बसतो ना बसतो तोच, आणखी एक नवीन एमडीची (मॅफेड्रॉन) चैन (साखळी) शहर गुन्हेशाखेच्या हाती लागली आहे.

काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर धावत्या वाहनात एमडी पुडीचा व्हिडिओ व्हायरल करीत पोलिसांना आव्हान देणाऱ्या दोघांना अखेर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे.

यातील एक संशयित हा टिप्पर गँगचा असून, त्यांच्याकडून एक लाखांची २० ग्रॅम एमडी जप्त केली आहे. (Two more found selling MD video viral on social media Nashik Drug Case crime news)

निखिल बाळू पगारे (२९, रा. विक्रीकर भवनसमोर, पाथर्डी फाटा, इंदिरानगर), कुणाल उर्फ घाऱ्या संभाजी घोडेराव (२२, रा. उत्तमनगर, सिडको) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. यातील निखिल पगारे हा सराईत गुन्हेगार असून तो टिप्पर गँगशी संबंधित आहे.

संशयित निखिल पगारे, कुणाल घोडेराव हे दोघे एमडी विक्री करण्यासाठी पाथर्डी शिवारातील दामोदरनगरमध्ये येणार असल्याची खबर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाचे अंमलदार मिलिंदसिंग परदेशी यांना मिळाली होती.

यासंदर्भाच युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना दिल्यानंतर दोघांना सापळा रचून जेरबंद करण्यात आले. त्यांच्या अंगझडतीतून १ लाख रुपयांची २० ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली.

याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात अंमलदार परदेशी यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, हेमंत नागरे, चेतन श्रीवंत, महेश साळुंके, मिलिंदसिंग परदेशी, विलास चारोस्कर, नितीन जगताप, मुक्तार शेख, राजेश राठोड, राहुल पालखेडे यांनी बजावली. तपास शहर गुन्हेशाखेचे युनिट एक व अंमली पदार्थ विरोधी पथक करीत आहे.

पोलिसांना दिले होते आव्हान

गेल्या नोव्हेंबर महिन्यात संशयित निखिल पगारे, कुणाल घोडेराव यांनी एका कारमध्ये हातात एमडी पावडरची पुडी असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता.

त्याचवेळी शहरात एमडी प्रकरणातून पोलिसांचे धाडसत्र सुरू होते. त्यातच हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शहरात एमडीचा मुक्त व्यापार सुरू असल्याचे भासवत संशयितांनी पोलिसांनाच आव्हान दिले होते. तेव्हापासून पोलिस संशयितांच्या मागावर होते.

एमडी पुरविणाऱ्याचा शोध

संशयित निखिल व कुणाल यांच्याकडे मिळून आलेली एमडी, त्यांनी कोणाकडून घेतली याचा पोलीस तपास करीत असताना आनंद जायभावे हे नाव समोर आले आहे. शहरातील एमडीसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये आनंद जायभावे हे नाव आले नव्हते.

त्यामुळे यातून एमडीची नवी चैन उघडकीस येण्याची शक्यता आहे. जायभावेचा पोलिस शोध घेत असून, त्याच्याकडून या गुन्ह्यातील संशयितांपर्यंत पोलिसांना पोहोचता येणार आहे.

पिस्तुल विक्रीतही सहभाग

संशयित निखिल पगारे हा सराईत गुन्हेगार असून, तो सिडकोतील कुख्यात टिप्पर गँगशी संबंधित आहे.

मोहम्मद सय्यद याच्याकडे पगारे याने पिस्तुल (गावठी कट्टा) विक्रीसाठी दिल्याचे तपासातून समोर आले. त्यानुसार भद्रकाली पोलिसात पगारे, सय्यद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है'वर राहुल गांधींची मार्मिक टिप्पणी; 'सेफ'मधून अदानी-मोदींचा फोटो काढत केलं 'लक्ष्य'

Maharashtra Weather Update: तापमानात घट, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामानाची स्थिती

मी बोलायला लागलो, तर घड्याळवाल्यांचा 'कार्यक्रमच' होईल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला थेट इशारा

Hypersonic Missile : एका सेकंदात 3.087 KM स्पीड, अर्धा चीन अन् पूर्ण पाकिस्तान रेंजमध्ये, जाणून घ्या भारताच्या नव्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ताकद

अभिनेत्री कश्मिरा शाहचा भयानक अपघात; रक्ताने माखले कपडे; पोस्ट शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT