Court Order esakal
नाशिक

Nashik Crime News : दुचाकी चोरट्याला 3 महिन्यांचा कारावास

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंचवटीतील कर्णनगर भागातून दुचाकी चोरणाऱ्या मालेगावातील एकाला अतिरिक्त मुख्य न्यायादंडाधिकारी प्रतिभा पाटील यांनी तीन महिने साध्या कारावास व दोनशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. गुन्हा दाखल झाल्यानंतर नऊ महिन्यांत या खटल्याचा निकाल लागला आहे. (Two wheeler thief jailed for 3 months Nashik Latest Crime News)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

अफताफअली अस्लमअली (१९, रा. ६० फुटी रोड, मालेगाव, जि. नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. सुनील श्रावण डगळे (रा. बजरंग अपार्टमेंट, कर्णनगर, पंचवटी) यांनी पंचवटी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची यामाहा मोटार सायकल (एमएच १५ एसएच ७९९१) बजरंग सोसायटीतील पार्किंगमध्ये पार्क केलेली असताना १९ एप्रिल २०२२ ला मध्यरात्री अफताप याने चोरुन नेली होती. पोलीस नाईक जी. एस. माळवाळ यांनी तपासाअंती अफताफला अटक केली होती. त्याच्याविरोधात सबळ पुरावे गोळा करून दोषारोपपत्र दाखल केले होते.

त्यानुसार खटल्याची सुनावणी झाली. न्या. प्रतिभा पाटील यांनी साक्ष व परिस्थितीजन्य पुराव्यानुसार, अफताफला दोषी ठरविले. चोरीच्या गुन्ह्यात तीन महिने साधा कारावास व दोनशे रुपये दंड तसेच दंड न भरल्यास १० दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता जी. आर. बोरसे यांनी कामकाज पाहिले. पैरवी अंमलदार व्ही. ओ. नागरे, महिला पोलिस शिपाई पी. पी. गोसावी यांनी पाठपुरावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT