Nashik News : चेहेडी येथील दारणा नदी वरील महापालिकेच्या चेहेडी बंधाऱ्यात सिन्नरफाटा भागातील दोन तरुण पाण्याच्या प्रवाहात सापडल्याने दोन जण बुडाले असून अग्निशमन दलाकडून रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरु होते. (Two youth drowned in Chehedi Dam Nashik News)
चेहेडी येथील दारणा नदीला आवर्तन सुरु असूननाशिक महापालिकेच्या चेहेडी बंधाऱ्याचे काही गेट उघडण्यात आले आहे. शनिवारी (ता. १०) दुपारी तीन च्या सुमारास चार युवक अंघोळीसाठी सिद्धार्थ संकेत गांगुर्डे (१७), राहूल दीपक महानुभाव (१८), संतोष नामदेव मुकणे व आर्यन नंदू जगताप गेले होते.
त्यातील दोघांनी बंधा-यावरुन पाण्याच्या प्रवाहात पुर्वेच्या दिशेला पाण्यात उड्या मारुन अंघोळ करीत असतांना नदीच्या किनारी आले परत सिद्धार्थ गांगुर्डे व राहूल महानुभाव हे दोघे पाण्याच्या उलट्या प्रवाहात सापडल्याने त्यांना बाहेर निघणे मुश्किल झाले होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यांनी बाहेर निघण्यासाठी मदत मागितली मात्र तो पर्यंत त्यांचा दम झाल्याने ते बुडाल्याचे दोन तीन तासाने त्यांचे सहकारी संतोष मुकणे यांने घरी येवून सांगितले.
त्यांनी त्वरीत आग्निशमन दलास कळविले अग्निशमन दलाचे रामदास काळे, राजेंद्र आहिरे, उमेश गोडसे, शिवाजी खुळगे, अशोक निलमणी, बाजाराव कापसे, राजेद्र खर्जुल, तानाजी भास्कर यांनी शोध मोहिम सुरु केली रात्री उशिरा पर्यंत शोध मोहिम सुरु होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.