नाशिक - लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार करत फसवणूक केल्याबद्दल अंबड पोलिस ठाण्यात संशयित प्रवीण अहिरे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संशयित अहिरे हे शिक्षण विभागातील उच्च अधिकारी असल्याचे समजते. या बाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित यांची सदर महिलेशी २०१६ ला ओळख झाली. त्या ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये झाले. मैत्रीतून प्रेमात आणि प्रेमातून प्रेमसंबंधात रूपांतर झाले.
अहिरे यांनी पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून संबंध ठेवले. मात्र लग्न केले नाही. पीडितेने लग्नासंबंधी विचारले असता संशयित आहिरे यांनी लग्नास नकार दिला, यावेळी आपली फसवणूक झाली असल्याचे पीडित महिलेच्या लक्षात आल्यानंतर या महिलेच्या फिर्यादीवरून श्री अहिरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.