Nashik News : श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे उद्यानाचा विकास व इतर कामांसाठी पालकमंत्री दादा भुसे यांच्या सहकार्याने १७ लाख ६२ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यासाठी श्री स्वामी समर्थ केंद्रातील अनेकांनी पाठपुरावा केला.
यामुळे हे काम मार्गी लागले, असे प्रतिपादन सह्याद्री युवा मंचचे अध्यक्ष उदय सांगळे यांनी केले.(Uday Sangle statement of Striving for development of Swami Samarth Kendra nashik news )
श्री स्वामी समर्थ उद्यान विकसित कामांचा प्रारंभ सांगळे यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. प्रा. यशवंत पाटील, माजी नगरसेवक शैलेश नाईक, इंजिनिअर संजय आणेराव, श्री. काळे, ज्ञानेश्वर कोकाटे आदी उपस्थित होते.
उदय सांगळे यांनी चांगली काम केली असून, त्यासाठी महाराज तुम्हाला सदैव आशीर्वाद देतील, असे गौरवोद्गार प्रा. यशवंतराव पाटील यांनी काढले.
स्वामी समर्थ सेवा केंद्राचा आध्यात्मिक परिसर विकसित करण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यास कटिबद्ध असल्याचे श्री. सांगळे यांनी सांगितले.
ज्ञानेश्वर कोकाटे, नीलिमा शेलार, मनोहर शेलार, शरद कासार, राजेंद्र क्षत्रिय, बाळासाहेब पवार, श्याम तिवारी, नीलेश झगडे, अनिल नाईक, रवींद्र कोकाटे, रवींद्र लहामगे, राजेंद्र खुळे, श्री स्वामी समर्थ सेवेकरी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.