Bharati Pawar esakal
नाशिक

NMC News: डेंगीवरून आरोग्य राज्यमंत्र्यांकडून नाशिक महापालिकेला अल्टिमेटम

सकाळ वृत्तसेवा

NMC News : महापालिकेच्या लेख्यांवर डेंगी रुग्णांची संख्या कमी दिसत असली तरी प्रत्यक्षात खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात डेंगीचे रुग्ण उपचार घेत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी महापालिकेला अल्टिमेटम देताना तातडीने डेंगी, मलेरिया, चिकनगुण्या तसेच साथीच्या आजार नियंत्रणात आणण्यासाठी मिशन मोडवर आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. (Ultimatum from Minister of State for Health to Nashik NMC on Dengue)

चिकनगुण्या, डेंगी व मलेरिया आजारांच्या सद्यस्थितीबाबत दूरदृश्‍यप्रणालीद्वारे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांनी बैठक घेतली.

जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, मालेगाव महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी, आरोग्य उपसंचालक डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, मालेगाव महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री आहेर, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन रावते, जिल्हा मलेरिया अधिकारी डॉ. माधव अहिरे, बायोलॉजिस्ट डॉ. राजेंद्र त्र्यंबके आदी बैठकीला उपस्थित होते.

शहर व जिल्ह्यात डेंगीच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महापालिकेकडे डेंगीच्या रुग्णांची माहिती देणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे आकडेवारी येत असल्याचा दावा वैद्यकीय विभागाकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालयांत रुग्ण उपचार घेत आहेत.

ऑगस्टमध्ये महापालिका हद्दीत जवळपास ११५ डेंगीचे रुग्ण आढळून आले. परंतु, त्यापेक्षा अधिक रुग्ण असल्याची तक्रार आहे. त्या अनुषंगाने डेंगीबरोबरच मलेरिया, चिकनगुण्या आजार नियंत्रणात आणण्याच्या सूचना दिल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नागरिकांमध्ये परिसर स्वच्छ व कोरडा ठेवण्यासाठी विविध माध्यमांद्वारे जनजागृती करावी, संशयित रुग्णांची शासकीय रुग्णालयात मोफत तपासणी करून त्यांना आवश्यक ते सर्व उपचार वेळेत द्यावेत, निर्धारित उपचार पद्धतीचा काटेकोरपणे अवलंब करावा, खासगी रुग्णालयांबरोबर समन्वय साधून तपासण्या व उपचार वेळेत होतील यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.

समन्वय ठेवून आढावा

ज्या भागांमध्ये संशयित रुग्ण आढळतील तेथे सर्वेक्षण करावे, तसेच जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी साथीच्या आजारांबाबत नियमित आढावा घेऊन त्याविषयी सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा, अशा सूचनाही दिल्या.

उपचारांसाठी लागणारी औषधे, तपासणी किट व लसीचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही त्यांनी या वेळी दिले.

महापालिका क्षेत्रात डेंगीच्या सात रुग्णांपैकी पाच रुग्ण खासगी व दोन रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती आयुक्त करंजकर यांनी दिली.

ग्रामीण भागात मलेरियाचे दोन रुग्ण असून, ते घरीच उपचार घेत असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT