The process is for the child to be adopted e-sakal
नाशिक

अनधिकृतरित्या बालक दत्तक घ्याल तर गुन्हा दाखल होईल

अनधिकृतरीत्या मूल दत्तक घेणे अथवा देणे हा बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ व केंद्रिय दत्तक ग्रहण प्रकिया मार्गदर्शिका २०१७ नुसार दंडनीय अपराध आहे.

विनोद बेदरकर

नाशिक : कोरोना(Corona) महामारीत बालकांना दत्तक(Adopt) घेणे व देणे याबाबत समाजमाध्यमांवर(social media) विविध संदेश येत आहेत. अशा परिस्थितीत कोणत्याही बालकाची अनधिकृतपणे दत्तक देवाणघेवाण होऊ नये, यासाठी जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या ०२५३-२२३६३६८ व २२३६२९४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुरेखा पाटील यांनी केले. (Unauthorized adoption will result in criminal charges)

नोंदणी करणे गरजेचे

अनधिकृतरीत्या मूल दत्तक घेणे अथवा देणे हा बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम(Protection Act) २०१५ व केंद्रिय दत्तक ग्रहण प्रकिया(Central adoption process) मार्गदर्शिका २०१७ नुसार दंडनीय अपराध आहे, केंद्रीय दत्तक ग्रहण प्रकिया मार्गदर्शिका २०१७ नुसार बालक दत्तक घेण्याची अथवा देण्याची प्रकिया ही www.cara.nic.in संकेतस्थळावरूनच करण्यात येते. कोविड महामारीच्या काळात बालकांचे आई व वडिल मृत झाल्याने बालके एकटी असतील अथवा दोन्ही पालक कोविड- १९(Covid-19) चा उपचार घेत असतील व बालकांना सांभाळण्यास कोणी तयार नसेल अशा वेळी जिल्ह्याची बालकल्याण समिती, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बालसंरक्षण कक्ष, बालन्याय अधिनियमान्वये बालकांची काळजी घेणारी नोंदणीकृत संस्था, जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. अशा बालकांच्या मदतसाठी महिला व बालविकास विभागामार्फत टोल फ्री क्रमांक १०९८, ८३०८९९२२२२, ७४०००१५५१८८ उपलब्ध केले आहेत.

अनधिकृत दत्तक नाही

''कोणतेही बालक अनधिकृतपणे दत्तक दिले जाणार नाही, याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. तसेच कोविड- १९ मुळे आई- वडील मृत(dead) झालेले आहेत, बालकांना दत्तक देणे आहे अशा स्वरूपाची माहिती मिळाल्यास तत्काळ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा अथवा जिल्हा बालसंरक्षण कक्ष नाशिकच्या ०२५३-२२३६३६८/२२३६२९४ या कमांकावर संपर्क साधावा.''

- सुरेखा पाटील (जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, नाशिक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT