Unauthorized hoardings in municipal limits esakal
नाशिक

Nashik News: पंचवटीत अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट! सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांना त्रास

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महापालिकेच्या हद्दीत अनधिकृत होर्डिंग सर्रास लावण्यात येत असून, पंचवटी परिसरात तर त्याच कहरच झाला आहे. पंचवटीतील चौक आणि रस्ते होर्डिंगने व्यापले असून, नागरिकांना, तसेच व्यावसायिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

मखमलाबाद, म्हसरूळ, नांदूर नाका, आडगाव, पंचवटी कारंजा, आडगाव नाका, काळाराम मंदिर परिसर, रामतीर्थ आदी परिसरात मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावण्यात आले आहेत. होर्डिंग लावण्यासाठी नियमावली असताना तिचे पालन केले जात नाही.

महापालिकेच्या परवानगीशिवाय अनेक होर्डिंग लावण्यात येत आहेत. महापालिकेची यंत्रणाही त्याकडे दुर्लक्ष करत असून, याला कुणाचा आशीर्वाद आहे ,असा प्रश्न विचारला जात आहे.

दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या मेहरबानीमुळे कारवाई होणार नाही, अशी कार्यकर्त्यांची खात्री झाल्याने अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढतच आहे. (Unauthorized hoarding in Panchavati Harm to ordinary citizens professionals Nashik News)

नाशिक महापालिकेने अधिकृत होर्डिंग्ज लावण्यासाठी शहरातील विविध भागात अधिकृत जागा दिल्या आहेत, असे असतानाही शहरातील अनेक भागात, चौका-चौकात अनधिकृत होर्डिंग्ज लावण्यात येत आहेत.

वाढदिवस, जयंती उत्सव, उद्‍घाटन, क्लासेस यांसह काही ना काही कारणासाठी होर्डिंग्ज लावणे ही एक फॅशन झाली आहे. या अनधिकृत होर्डिंगमुळे अनेक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.

अनेक ठिकाणी व्यावसायिकांच्या दुकानांसमोर होर्डिंग लावले जात आहेत. जर कोणी अशा होर्डिंगला विरोध केला, तर त्याला नंतर त्रास दिला जातो.

महापालिका हद्दीत कुठल्याही ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे होर्डिंग्ज लावायचे असल्यास प्रत्येक विभागीय कार्यालयात ‘जाहिरात परवाना विभाग’ (एमटीएस) कार्यरत आहे.

याच विभागाकडून सर्व प्रकारच्या होर्डिंग्ज लावण्यासाठी परवानगी घ्यावी लागत असून, त्यानंतर होर्डिंग्ज लावले जातात. मात्र, फार थोड्या प्रमाणात होर्डिंगसाठी परवानग्या घेतल्या जात आहेत. अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर कारवाई करून हे प्रकार थांबविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

परवानगी आहे का?

लावलेल्या होर्डिंगपैकी किती जणांनी अधिकृत परवानगी घेतलेली आहे किंवा नाही याची खातरजमा महापालिकेची यंत्रणा का करत नाही? त्यांच्यावरही कुणाचा दबाव आहे का? अनधिकृत होर्डिंगमुळे महापालिकेच्या बुडणाऱ्या महसुलाचे काय?

असे अनेक प्रश्न यातून निर्माण होत असून, अशा होर्डिंगवरून नुकतीच सांगवी (ता. शिरपूर) येथे दोन गटांत तुफान दंगल होऊन तिला जातीय स्वरूप प्राप्त झाले होते.

अशा अनधिकृत होर्डिंगवरून असाच प्रसंग उद्‍भवला तर त्याला कोण जबाबदार राहणार? असा प्रश्न यानिमित्ताने पुढे येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT