Hoarding esakal
नाशिक

Nashik News: आयुक्तालयासमोर दिशादर्शक कमानीवरच अनधिकृत होर्डिंग!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अनधिकृत होर्डिंग्स्‌मुळे शहराचे विदुपीकरण होत असताना त्याविरोधात नेहमीच कारवाईची मागणी होत असते. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला जाग आली तर अनधिकृत होर्डिंगविरोधात कारवाई केली जाते.

तर कधी पोलिसांकडूनही अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या होर्डिंग्स्‌वर कारवाई केली जाते. परंतु आता तर थेट गंगापूर रोडवरील पोलीस आयुक्तालयासमोरच असलेल्या महापालिकेच्या दिशादर्शक कमानीवरच वाढदिवसाचे अनधिकृत होर्डिंग लावण्यात आलेले आहे. (Unauthorized hoarding on direction arch in front of Commissionerate Nashik News)

या रस्त्याने पोलीस आयुक्तांसह सरकारवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व महापालिकेच्या अधिकार्यांची वाहने जात असताना यातील कोणालाही हे अनधिकृत होर्डिग नजरेला पडले नसावे का? की, होर्डिंगवरील व्यक्तीच्या वजनामुळे थेट दिशादर्शक कमानच झाकली तरी चालते, अशी चर्चा जागरुक नागरिकांमध्ये आहे.

अशोकस्तंभाकडून गंगापूर रोडच्या दिशेने जाणार्या रस्त्यावरच पोलीस आयुक्तालय आणि त्याशेजारीच सरकारवाडा पोलीस ठाणे आहे. पोलीस ठाण्याच्या समोरच केटीएचएम महाविद्यालय व मराठा हायस्कुल आहे.

तर, याच रस्त्यावर उड्डाणपुल आहे. पोलीस आयुक्तालय आणि सरकारवाडा पोलीस ठाणे या रस्त्यादरम्यानच महापालिकेची दिशादर्शक कमान आहे. या कमानीवर पुढील रस्त्यांची दिशा दर्शविण्यात आलेली आहे.

मात्र या दिशादर्शक कमान शहरातील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्याच्या वाढदिवसाचा फलक लावण्यात आलेला आहे.

या वाढदिवसाच्या फलकामुळे संपूर्ण कमानीवारी दिशादर्शक झाकली गेल्याने नव्याने शहरात येणाऱ्यास या रस्त्यावरील वळणाची दिशाच कळू शकणार नाही. तर, शहरातील काही जागरुक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

काही दिवसांपूर्वी त्र्यंबकरोडवरील पिनॅकल मॉलसमोरील कमानीवरही अशाच रितीने वाढदिवसाचे होर्डिंग लावले असता, ते महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटविले होते.

तर शहर पोलिसांनीही अनेकदा असे अनधिकृतरित्या उभारण्यात आलेले फलक काढून संबंधितांविरोधात शहर विद्रुपीकरणसंदर्भात गुन्हेही दाखल केलेले आहेत.

असे असताना या पदाधिकार्याने थेट पोलीस आयुक्तालयासमोरील कमानीवरच अनधिकृतरित्या होर्डिंग लावून महापालिकेच्या अतिक्रमण विभाग आणि पोलिसांच्या कारवाईलाच आव्हान दिले आहे.

मात्र असे असूनही या दोन्ही विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या राजकीय पदाधिकार्याचे ‘वजन’ वाढल्याचीच चर्चा शहरातील जागरुक नागरिकांमध्ये सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT