Team during encroachment action in Ambad Industrial Estate esakal
नाशिक

Nashik News: अंबड औद्योगिक वसाहतीतील अनधिकृत हॉटेल्स भुईसपाट

सकाळ वृत्तसेवा

सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीतील सिमेंस कंपनीसमोरील अनधिकृतपणे टाकलेल्या टपऱ्या, हॉटेल्स पथकाने जमीनदोस्त केले आहे.

या कारवाईदरम्यान सामाजिक कार्यकर्ते व अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत वादविवादाचे प्रसंग घडले. मात्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याने अधिकृत अतिक्रमण भुईसपाट करण्यात आले. (Unauthorized hotels in Ambad Industrial Estate ground remobved by nmc encroachment department Nashik News)

अंबड औद्योगिक वसाहतीतील मुख्य रस्ता मानल्या जाणाऱ्या गरवारे पॉइंट ते एक्सलो पॉइंट या रस्त्याच्या दुतर्फा बाजूला अनधिकृतपणे अनेक वर्षांपासून हॉटेल व्यावसायिकांनी चहाच्या टपऱ्या, पान स्टॉल थाटले आहे.

अनेक चायनीज, भेळ विक्रेते व पथविक्रेत्यांचाही समावेश आहे. या अनधिकृत अतिक्रमणामुळे येथून ये- जा करणाऱ्या कामगार वर्गाला विविध अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या अवजड वाहनांमुळे अपघात होण्याचे प्रकार घडतात.

त्यामुळे एमआयडीसी पोलिसांकडून कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिक्रमण कारवाई करण्याचे पत्र मनपाला देण्यात आले होते.

याअनुषंगाने सोमवारी (ता. ११) सायंकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मनोहर कारंडे यांच्यासह १५ अंमलदारांनी मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाला बंदोबस्त दिला होता.

सिडको, सातपूर, तसेच नाशिक रोड विभागाचे पथक दाखल होते. रस्त्यावरील चहाच्या टपऱ्या, पानस्टॉल, अनधिकृत हॉटेल्स, टेबल खुर्च्या असे एकूण तीन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले आहे.

कामगारांना वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या ठिकाणी अतिक्रमण थाटल्यास यापुढे नियमित अतिक्रमण कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेसह पोलिस प्रशासनाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT