Neo Metro project esakal
नाशिक

Nashik Neo Metro: टायर बेस मेट्रो निओ प्रकल्पासाठी ‘तारीख पे तारीख’! नारळही न फुटल्याने मृगजळाची अनुभूती

विक्रांत मते

Nashik Neo Metro : सन २०२१ मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात मेट्रो निओ प्रकल्पाची घोषणा करताना दोन हजार ९२ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली. अद्याप प्रकल्पाच्या कामाचा नारळही न फुटल्याने मेट्रो निओ प्रकल्पाच्या मृगजळाची अनुभूती नाशिककर घेताना दिसत आहेत.

डिसेंबर २०२३ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत संपुष्टात येत असल्याने मेट्रो निओ प्रकल्पासंदर्भात अनिश्चितता निर्माण झाली आहे. (Uncertainty arisen regarding Metro Neo project as deadline to complete project by December 2023 running out nashik)

नाशिकची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने नाशिकला पारंपरिक मेट्रोऐवजी एलीव्हेटेड टायरबेस मेट्रो निओ प्रकल्प दिला. टायरबेस मेट्रोचा देशातील पहिलाच प्रकल्प नाशिकला होणार असल्याने नाशिककरांची उत्सुकता वाढली.

सन २०२१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात प्रकल्पाची घोषणा करताना दोन हजार ९२ कोटींची आर्थिक तरतूदही करण्यात आली.

एकूण प्रकल्पाच्या रकमेपैकी महाराष्ट्र सरकार, सिडको व महापालिका २५५ कोटी रुपयांचा वाटा, केंद्र सरकार ७०७ कोटी रुपये, तर एक हजार १६१ कोटींचे कर्ज प्रकल्पासाठी उभारण्याची घोषणा करण्यात आली.

सन २०२३ अखेरपर्यंत मेट्रो निओ प्रकल्पाचे काम पूर्ण होईल, अशी घोषणा करण्यात आली. परंतु, केंद्र सरकारने प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपण्यास आता तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.

अद्याप केंद्रीय मंत्रिमंडळात प्रकल्पाची फाईल घिरट्या मारत आहे. त्यामुळे निविदा काढून त्यावर काम करायचे झाल्यास प्रकल्पाची मुदत वाढवावी लागेल.

प्रकल्पाची किंमत वाढणार

दोन हजार १९ कोटी रुपये एकूण प्रकल्पाची किंमत ग्राह्य धरण्यात आली. त्या वेळी बांधकाम साहित्याच्या दरानुसार किंमत निश्चित करण्यात आली होती. परंतु, तीन वर्षांत बांधकाम साहित्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले असल्याने प्रकल्पाची किंमतही वाढणार आहे.

राज्याचा प्रस्तावही धूळखात

केंद्र सरकारकडून हालचाल होत नसल्याने एप्रिलमध्ये नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारला नव्याने प्रस्ताव सादर करीत नाशिक रोड ते सीबीएस असा १०.४४ किलोमीटरचा टप्पा प्रायोगिक तत्त्वावर राज्य शासनामार्फत करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती पत्राच्या माध्यमातून केल्याची माहिती दिली होती.

त्यानंतर महापालिका व महामेट्रोच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात सिन्नर फाटा व गंगापूर रोड येथे कानेटकर उद्यानाच्या बाजूला असलेल्या तीन एकर मोकळा भूखंड देण्याची तयारी महापालिकेने केली. या व्यतिरिक्त प्रकल्पाच्या बाबतीत तसूभरही काम पुढे सरकलेले नाही.

असा आहे प्रस्तावित मेट्रो निओ प्रकल्प!

- देशातील पहिली एलिव्हेटेड टायरबेस मेट्रो सेवा.

- २५ मीटर लांबीच्या २५० प्रवासी क्षमतेच्या जोड बस.

्- जोड बस ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरच्या आधारे धावणार

- दोन एलिव्हेटेड कॉरिडोर व दोन फिडर कॉरिडोर उभारणार

- एकूण ३१.४० किलोमीटर लांबीचे एलिव्हेटर

- गंगापूर ते नाशिक रोड रेल्वेस्थानक २२ किलोमीटरचा पहिला कॉरिडोर.

- पहिल्या कॉरिडोरवर १९ स्थानके.

- गंगापूर ते मुंबई नाका १० किलोमीटरचा दुसरा कॉरिडोर.

- द्वारका क्रॉसिंगवरील उड्डाणपुलावर आणखी एक उड्डाणपूल.

- महापालिकेला १० टक्के आर्थिक भार उचलावा लागणार

अशी धावणार ‘मेट्रो निओ’!

मेट्रो निओसाठी सुरवातीला दोन एलिव्हेटेड कॉरिडोर उभारले जाणार आहेत. पहिला एलिव्हेटेड कॉरिडोर १० किलोमीटर लांबीचा असून, त्यात गंगापूर गाव, शिवाजीनगर, जलालपूर, गणपतनगर, काळेनगर, जेहान सर्कल, थत्तेनगर, पंचवटी, सीबीएस, मुंबई नाका अशी दहा स्थानके असतील.

दुसरा कॉरिडोर गंगापूर ते नाशिक रोड असा २२ किलोमीटर लांबीचा असून, त्यात गंगापूर गाव, शिवाजीनगर, श्रमिकनगर, एमआयडीसी, मायको सर्कल, सीबीएस, सारडा सर्कल, द्वारका, गांधीनगर, नेहरूनगर, दत्त मंदिर, नाशिक रोड अशी स्थानके असतील.

सीबीएस कॉमन स्थानक असून, या टायरबेस मेट्रोसाठी एकूण २९ स्थानके असणार आहेत. याशिवाय, दोन फिडर कॉरिडोर असतील. त्यापैकी एक सातपूर कॉलनी, गरवारे, मुंबई नाक्यादरम्यान चालेल; तर दुसरा नाशिक रोड, नांदूर नाका, शिवाजीनगरदरम्यान चालेल.

"तांत्रिक कारणांमुळे मेट्रो निओ प्रकल्पाला विलंब होत असला, तरी दिलेला शब्द आम्ही पाळणारच. अर्थसंकल्पात प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे विलंब झाला तरी प्रकल्प करूच. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून प्रकल्पातील अडथळे दूर करू."- ॲड. राहुल ढिकले, आमदार

"तीन वर्षांपूर्वी मेट्रो निओ प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. प्रकल्प उभारणीत तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम सुरू आहे. दिलेल्या शब्दाप्रमाणे प्रकल्प पूर्ण होईलच. प्रकल्पामुळे नाशिकच्या विकासाला गती मिळण्याबरोबरच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट होईल. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून प्रकल्प पूर्णत्वास नेऊ."

- प्रा. देवयानी फरांदे, आमदार

"नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने मेट्रो निओ प्रकल्प होणे गरजेचे आहे. तीन वर्षांपूर्वी घोषणा झालेल्या प्रकल्पाचे अद्यापही उद्‍घाटन होत नसेल तर याचाच अर्थ कुठेतरी लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती कमी पडत आहे. नाशिकच्या सर्वच प्रकल्पांच्या बाबतीत राजकीय महत्त्वाकांक्षा कमी पडते."- राजेंद्र अहिरे, सरचिटणीस, ‘निमा’

"मेट्रो निओ प्रकल्प नाशिकच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रकल्प झाल्यास वाहतुकीचे सर्व प्रश्‍न मार्गी लागतील. देशातील इतर शहरांतील प्रकल्प घोषणा होताच तातडीने पूर्ण होतात. नाशिकच्याच बाबतीत दुर्दैवाचा फेरा का?"

- सुरेश पटेल, संचालक, चिल्ड्रन ट्राफीक पार्क

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT