ncp crisis  Esakal
नाशिक

Sharad Pawar: शरद पवारांच्या नेतृत्वाखाली सोमवारी कांदाप्रश्नी चांदवडला आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

Sharad Pawar : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातमूल्यामध्ये वाढ केल्यानंतर आता कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी घातली आहे.

कांदा निर्यातबंदीच्या विरोधात येत्या सोमवार (दि.११) रोजी सकाळी साडेदहाला चांदवड येथील चौफुलीवर राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन होणार आहे. (Under leadership of Sharad Pawar protest on Monday in chandwad on onion banned issue nashik onion news)

आंदोलनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राज्य महिला आयोगाच्या सदस्या तथा माजी आमदार दीपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष केशव मांडवडे यांनी केले.

यासंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना तालुकाध्यक्ष श्री. मांडवडे म्हणाले, की कांद्याचे दर पाडण्यासाठी कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क, नंतर किमान निर्यात मूल्यात प्रचंडवाढ असे तुघलकी शेतकरीविरोधी निर्णय घेणाऱ्या केंद्र सरकारने आता कांदा निर्यातीवर ३१ मार्च २०२४ पर्यंत सरसकट बंदी घातली आहे. हे अन्यायकारक आहे.

एकीकडे अवकाळी पाऊस, गारपिटीच्या अस्मानी संकटाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत असताना केंद्र शासन मात्र बळिराजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली असताना शेती उद्धवस्त झाली आहे. कांद्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र मदत करण्याऐवजी केंद्र सरकार शेतकऱ्यांवर घाव घालण्याचे काम करीत आहे.

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी तुघलकी निर्णयांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: रस्त्यावर उतरणार असून सोमवार (ता. ११) रोजी सकाळी साडेदहाला वाजता चांदवड येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील चौफुलीवर त्यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन छेडण्यात येणार आहे.

आंदोलनात कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, नांदगाव व चांदवड तालुक्यातील शेतकरी बांधव, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election : विधानसभेच्या तयारीला लागा! केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा जाहीर; 'या' दोन तारखा आहेत महत्त्वाच्या

Bank Deposit: भारतात बँक ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याचे युग संपले; SBIच्या माजी प्रमुख असं का म्हणाल्या?

Latest Marathi News Updates : RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घेतली भेट

Sharad Pawar: श्रीगोंद्याचे शिष्टमंडळ घेणार शरद पवारांची भेट, जाणून घ्या काय आहे कारण?

आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले अन्...! R Ashwin शतकी खेळीनंतर काय म्हणाला ते वाचा

SCROLL FOR NEXT