नाशिक : गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हीएशनच्या विमानतळावरील अज्ञात ड्रोनचा शोध घेण्यात अद्याप यंत्रणेला यश आलेले नाही. अलीकडे ही लष्करी आस्थापनेच्या सुरक्षा भेदण्याचा तिसरा प्रयत्न आहे. सुरक्षेच्या संवेदनशील विषयात लष्करी प्रशासनाकडून अधिकृतरीत्या गुन्हा दाखल असला तरी स्थानिक पोलिस यंत्रणाकडून मात्र जणू खेळण्यातील ड्रोन उडले असावे, इतक्या सहजपणे हा विषयाकडे पाहिला जात आहे. (unidentified Flying Drone Case Security of military installations repeatedly unsuccessful Nashik Latest Marathi News)
नाशिकच्या लष्करी आस्थापनामध्ये घुसून रेकी करण्याचे प्रयत्न नवीन नाहीत. सातपूरला बिलाल नावाच्या एकाला महाराष्ट्र पोलिस अकादमीसह संवेदनशील यंत्रणाची रेकी करण्याचे एक प्रकरण उजेडात आले होते. त्यानंतर लष्करी अधिकारी असल्याचे सांगून थेट देवळाली कॅम्प तोफखाना केंद्रात प्रवेश करताना हरसूल (ता. चांदवड) येथील एका तोतया मेजर गणेश पवार याला पकडण्यात आले.
हिंदुस्थान एरोनॉटिक्समधील एकजण हनी ट्रॅपमध्ये सापडला. त्याने सोशल मीडियावर महिलेच्या प्रोफाइलवर भुरळून विमान सुरक्षेविषयी काय काय माहिती दिली याचा बरेच दिवस तपास सुरू आहे. त्यानंतर पुन्हा ड्रोनचा विषय पुढे आला आहे. मात्र त्यानंतरही ड्रोनचा तपास लागलेला नाही.
वारंवार दणके, तरीही...
संवेदनशील केंद्राच्या रेकी प्रकरणात सातपूरला बिलाल नावाच्या एका संशयिताला पोलिसांनी पकडले होते. महाराष्ट्र पोलिस अकादमीसह अनेक संवेदनशील केंद्राची रेकी केल्याचे पुढे आले होते. त्यानंतर देवळाली कॅम्पला पकडलेल्या एका तोतया मेजर गणेश पवार, तसेच त्याच्यासाठी काम करणाऱ्या परशुराम भाऊसाहेब आहेर, मेकॅनिकल इंजिनिअरला अटक झाली होती.
एयर फोर्समधील विमान निर्मितीविषयक माहिती चोरीचा प्रकार उघडकीस आला. हनी ट्रॅपमध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक्समधील एकाला फसविल्याचे गुप्तचर विभागाच्या चौकशीत प्रकरण पुढे आल्यानंतर त्याची चौकशी पूर्ण झाली नाही तोच पुन्हा आता एका ड्रोनने लष्करी सुरक्षेला भगदाड पाडल्याचे पुढे आले.
लष्करी सुरक्षा रडारवर
तिन्ही प्रकरणांच्या निमित्ताने नाशिकची लष्करी सुरक्षाव्यवस्था रडारवर असल्याचे वारंवार पुढे आले आहे. तिन्ही प्रकरणात गंभीर स्वरूपाच्या डेटाशी ही प्रकरण निगडित असल्याचे पुढे आले आहे. देवळाली कॅम्पला मिलिटरी हॉस्पिटल गेटजवळ पकडलेला तोतया मेजर इस्सार (हरियाना) येथील ११५ फिल्ड रेजिमेंटमध्ये पोस्टिंग असल्याची बतावणी करीत, लष्करी केंद्रात घुसत रेकी करत असताना बिंग फुटले.
तोतया मेजरच्या लॅपटॉपमध्ये अंबाला, अटल टनेलसह देशातील लष्कराच्या देशातील संवेदनशील तळांचे फोटोसह माहिती हस्तगत केली गेली. हनी ट्रॅपमधील संशयितावर विमानाच्या सुरक्षेशी निगडित माहिती पुरविली गेल्याचा संशय आहे. त्यामुळे संशयित ड्रोन हा खेळण्यातील ड्रोन असल्याचा स्थानिक पोलिसांचा संशय निर्माण करणारा आहे.
त्यामुळे चौकशीचे बालंट टाळण्यासाठीचा खटाटोप म्हणून तर उपनगर, इंदिरानगर, वडाळा भागातील पोलिसांची टोलवाटोलवी सुरू असेल तर लष्करी गुप्तचर यंत्रणांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची गरज आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.