NCP president Sharad Pawar  esakal
नाशिक

शरद पवार यांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्त पत्रलेखनाचा अनोखा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

चांदोरी (जि. नाशिक) : रयत शिक्षण संस्थेने शेकडो वर्षांपासून बहुजन, पीडित, गरीब, कष्टकरी वर्गास शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून साक्षर नव्हे, तर सुसंस्कृत बनविण्याचे कार्य संस्थेने केले आहे. या संस्थेची वाटचाल आजही तितक्याच ताकदीने सुरू आहे. याचे श्रेय जाते ते संस्थेच्या विकासात वाहून घेतलेल्या सर्व रयतसेवकांच्या निष्ठेला. यामध्ये विद्यमान अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे योगदान मोलाचे आहे.

रयतच्या विद्यार्थ्यांकडून पवारांना कृतज्ञ अभिवादन

शरद पवार यांच्या नेतृत्वात संस्था विकासचा, संस्था प्रगतीचा आलेख उंचावत गेला आहे. त्याप्रति संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांकडून त्यांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अव्यक्त भावनांना मोकळी वाट हा पत्रलेखनाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. आदर्श युवा प्रतिष्ठानचे सिद्धार्थ वनारसे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९१९ मध्ये लावलेली रयतरुपी ज्ञानज्योत आज पवारांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक नभांगणात सूर्य म्हणून तेवत आहे. उत्कर्षाच्या नव्या नव्या क्षितिजांवर आज रयतचे विद्यार्थी आहेत. देश सांभाळणारे उच्च पदस्थ अधिकारी असोत की पोट सांभाळणारा शेतकरी, लहान-मोठे क्षेत्र कोणतेही असो त्यावर रयतच्या विद्यार्थांनी यशाचा ठसा उमटविला आहेच. या सर्व जडणघडणीत पडद्याआड मोलाची भूमिका निभावली आहे ती म्हणजे शरद पवार यांनी.

रयत संस्थेचा विकास हा तिचे अध्यक्षपदी सारथ्य करणाऱ्या पवारसाहेबांच्या दूरदृष्टीचा परिपाक आहे. त्यांच्या या शैक्षणिक योगदानाबद्दल रयतच्या आजी-माजी विद्यार्थ्यांना कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. यातूनच ‘अव्यक्त भावनांची मोकळी वाट’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थांना पवारसाहेबांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना पत्र लिहून आपल्या ऋणभावना व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे. प्राप्त पत्रांपैकी उत्कृष्ट पाच पत्रांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सागर आहेर यांच्या संकल्पनेतून, चांदोरी गट जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे यांच्या आयोजनातून रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी याठिकाणी ही पत्रलेखन स्पर्धा होणार आहे. उपक्रमास विद्यार्थ्यांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


''उत्तुंग व्यक्तिमत्त्वाप्रति असलेल्या अव्यक्त भावनांना शब्दरूपात व्यक्त करून त्यांच्या योगदानाला अभिवादन करावे, या माझ्या इच्छेतून रयतच्या विद्यार्थ्यांना सोबत घेत पत्रलेखनरुपी एक छोटा प्रयत्न करत आहोत.'' - सिद्धार्थ वनारसे, सदस्य जिल्हा परिषद, आदर्श युवा प्रतिष्ठान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "भाजपचा नोट जिहाद सुरु"; विनोद तावडे प्रकरणावर ठाकरेंची कडवी प्रतिक्रिया

Virar : क्षितीज ठाकूर यांनी दाखविलेल्या डायऱ्यांमध्ये नेमके काय? नावांपुढे लिहिले...

Chandrakant Tingare: माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरेंवर हल्ला! पुण्यातील वडगावशेरीत घडली घटना

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'नंतर निर्मात्यांनी केली नव्या सिनेमाची घोषणा ! 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

Latest Marathi News Updates : विनोद तावडे यांच्या पत्रकार परिषदेला थोडाचवेळात सुरुवात होणार

SCROLL FOR NEXT