निफाड (जि. नाशिक) : निफाडच्या उत्तर भागातील ब्राह्मणगांव, वनसगांव भागातही शनिवारी सायंकाळी झालेल्या गारपीटीने द्राक्ष, कांदा शेतीचे आतोनात नुकसान झाले. त्यामुळे द्राक्षपंढरीत नेत्यांचे दौरे अन् पंचनामे करण्यासाठी शासनाची वाट पाहातच रविवारी (ता. १९) दिवसाची सुरवात झाली. (Unseasonal Rain Bunch bead leaf rot in vineyards Farmer in trouble nashik news)
कुंभारी व पंचकेश्वर शिवार केंद्रबिंदु बनलेल्या या पावसात सुपारीएवढ्या आकाराच्या गारांनी तडाखा दिला. शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर झालेल्या गारांच्या माऱ्याने शेतात तयार झालेला द्राक्षमाल अन् पानेही अक्षरश: ओरबाडुन टाकल्यागत शेतात पडलेली होती.
शेतकऱ्यांचे घर-आंगण आणि शेत-शिवारात गारांचा थर साचलेला होता. रानवड, ब्राह्मणगांव, वनसगांव, उगांव, नांदुर्डी शिवारातही द्राक्ष, कांदा, गहु, मका, कोथंबीर, भोपळा या पिकांचे पूर्णत: नुकसान झाले.
गारपीटग्रस्त भागात महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले, नाशिक विभाग अध्यक्ष ॲड. रवींद्र निमसे, मानद सचिव बाळासाहेब गडाख यांच्यासह संचालक मंडळाने पाहणी केली.
हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....
दुरगामी परिणामांचा धोका गारपीटग्रस्त भागातील शेतजमीनीवर सुमारे दोन तास गारांचा थर पडुन होता. यामुळे द्राक्षवेलीची मुळे, पेशी पुर्णपणे बंद पडुन द्राक्षवेलीच्या वाढीवर त्याचे दुरगामी परिणाम होण्याचा धोका वाढला आहे. द्राक्षवेलीवर शिल्लक राहिलेल्या द्राक्षमण्यांना तडे गेले आहेत. यात सुर्यप्रकाश पडल्यावर नुकसानीची तीव्रता अधिक वाढत आहे. "द्राक्ष उत्पादक भागात दरवर्षी अवकाळी पावसाचे आगमन ठरलेले आहे. त्यातून द्राक्षमाल वाचविण्यासाठी द्राक्षबागेला क्रॉप कव्हर हाच एकमेव पर्याय आहे. मात्र त्याच्या उभारणीसाठी येणारा खर्च हा सामान्य शेतकऱ्याच्या अवाक्याबाहेर असल्याने शासनाने मागेल त्याला क्रॉप कव्हर योजना पन्नास टक्के अनुदान तत्वावर राबवावी. गारपीटग्रस्त भागाचे सरसकट पंचनामे करुन बँकांची कर्जवसुली थांबवावी." -रविंद्र निमसे, नाशिक विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ. "हार्वेस्टिंग केल्या जात असलेल्या द्राक्षबागांची द्राक्षमाल काढणी थांबवुन व्यापारी, निर्यातदार हे द्राक्ष बागयतदारांना कोंडीत पकडत आहेत. चिली, पेरु, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल स्पेन या देशांतही अवकाळी गारपीट झाल्यावर दोन दिवसांनी बाधित नुकसानग्रस्त द्राक्षमणी विरळणी करुन उर्वरीत द्राक्षमाल निर्यात करतात. त्याचप्रमाणे भारतीय निर्यातदार, व्यापारी यांनी गारपीटग्रस्त भागातील द्राक्षमाल विक्रीसाठी घ्यावा. अचानक नकार देऊन द्राक्ष बागायतदारांना कोंडीत पकडू नये." -कैलासराव भोसले, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.