Damage to the wheat crop due to untimely rains of heavy hail in the middle of the night. esakal
नाशिक

Nashik Rain : इगतपुरीत मध्यरात्री सोसाट्याचा वारा, मेघगर्जनेसह मुसळधार गारांच्या अवकाळीचे तांडव!

ज्ञानेश्वर गुळवे

अस्वली स्टेशन (जि. नाशिक) : इगतपुरीत मध्यरात्री जोरदार सोसाट्याचा वारा अन मेघगर्जनेसह गारांचा अवकाळी पाऊस (Unseasonal rain) बरसला रब्बी हंगामातील गहू,हरभऱ्यासह उन्हाळ कांद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. (Unseasonal rain caused huge damage to rabi season wheat, gram summer onion crop nashik news)

शेतात काढणी करुन पोळ लावून ठेवलेला हरभरा, काढणीसाठी आलेला गहू, कांदा पीक गारांच्या मुसळधारेने अक्षरशः झोडपून काढल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना अवकाळीचा तडाखा बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

सकाळ पासूनच वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. संध्याकाळी आठ वाजेदरम्यान आकाशात विजा चमकत होत्या मध्यरात्री साडे बारा वाजता अचानक मेघगर्जनेसह जोरदार सोसाट्याचा वारा सुटला अन गारांच्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

तासभर झालेल्या मुसळधारेने इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील अस्वली स्टेशन, बेलगाव कुऱ्हे,नांदुरवैद्य, कुऱ्हेगाव,गोंदे दुमाला परिसर अक्षरशः झोडपून काढले. मध्यरात्रीच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र काढणीसाठी आलेल्या गहू,हरभरा,कांदा पिकांसह चाऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

साठवून ठेवलेला कडबा चारा भिजल्याने चाराटंचाईचे संकट

ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर साठवून ठेवलेला कडबा,तनास,गवताचा चारा मुसळधार पावसाने भिजल्याने खराब झाला आहे.त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरवातीलाच चारा नष्ट झाल्याने आगामी काळात चाराटंचाईचे संकट उभे राहणार असल्याची चिंता पशुपालक शेतकऱ्यांना लागली आहे.

"मध्यरात्रीच्या सुमारास शेतकरी गाढ झोपेत असतांनाच अचानक झालेल्या गारांच्या अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील गहू,हरभरा, कांदा पिकांसह बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्याचप्रमाणे जनावरांसाठी साठवून ठेवलेला कडबा चारा पूर्णपणे पावसात भिजल्याने खराब झाला असल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळ्यात चाराटंचाईची चिंता पशुपालक शेतकऱ्यांना लागली आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी." - कांदा उत्पादक शेतकरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT