A farmer showing a spoiled onion in the ground.  esakal
नाशिक

Unseasonal Rain Crop Damage : अवकाळीने कांदा काढणी लांबणीवर; कांदा जमिनीत सडण्यास सुरवात

सकाळ वृत्तसेवा

Unseasonal Rain Crop Damage : बागलाण तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार (Nashik News) हजेरी लावल्याने कांदा काढणी लांबणीवर पडली असून वाफ्यात अजूनही चिखल असल्याने तयार कांदा जमिनीत सडू लागल्याने शेतकरी हतबल झाला आहे. (Unseasonal rain crop damage delay in onion harvesting nashik news)

तालुक्यात उन्हाळ कांदा प्रमुख नगदी पीक असून नियोजनानुसार कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली. पश्चिम भागात काळी कसदार जमीन असल्याने कसमादे पट्ट्यात उन्हाळ कांद्याचे आगर समजले जाते.

उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन थंडीच्या हंगामात कांद्याची लागवड चांगली तर कांदा पोसायला मार्च एप्रिलपासून सुरवात होते. मॉन्सूनपूर्व पावसाच्या आगमनापूर्वी पिकविलेला कांदा शेतातून सुरक्षितपणे चाळीत साठविण्याच्या दृष्टीने नोव्हेंबर पासून डिसेंबर अखेरपर्यंत लागवड करण्यासाठी कांदा बी पेरणी पासून खरिपातील मका, सोयाबीन व बाजरीची सोंगणी, शेतीची मशागत शेणखत टाकून लागवडीचे नियोजन करतात.

यंदा देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा पिकासाठी आवश्‍यक ती संपूर्ण तयारी केली. रासायनिक खतांची टंचाई, अतिरिक्त भारनियमन व वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, सततच्या ढगाळ वातावरणातील रोगट हवामानात महागड्या बुरशीनाशक आणि कीटकनाशकांची फवारणी करून कांदा पिकवला.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

परंतु मागील काही दिवसांपासून तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने बळिराजा पुरता हैरान झाला आहे. शेतात पिकलेला कांदा काढणी करून चाळीत साठवणूक करण्याच्या धावपळ सुरू असतानाच अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले आहे. अनेक शेतांमध्ये काढणी केलेला कांदा भिजून खराब झाला तसेच शेतात पाणी साचल्याने कांदा काढणी लांबणीवर पडली आहे.

सध्याच्या ढगाळ वातावरणात शेत वळण्यासाठी विलंब होत आहे. परिणामी वाफ्यात अजून चिखल असल्यामुळे परिपक्व झालेला कांदा जमिनीतच सडत आहे. त्यामुळे भरमसाट भांडवली खर्च व गेली चार महिने कष्टाने पिकविलेला कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर खराब होत आहे. यामुळे कांदा उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे.

"सध्या जमिनीवर कांद्याच्या पातीचे आच्छादन आहे. ढगाळ वातावरणामुळे कडक ऊन पडत नसल्याने कांदा काढणी योग्य जमीन वाळण्यासाठी अजून पात ते सहा दिवस वाट पहावी लागणार आहे. तोपर्यंत मात्र निम्म्याहून अधिक कांदा जमिनीतच खराब होणार आहे." - प्रमोद बिरारी, कांदा उत्पादक शेतकरी

एकरी कांदा उत्पादन खर्च

मशागत १२ हजार रुपये

शेणखत ८ हजार रुपये

रासायनिक खते १८ हजार रुपये

कांदा बी ९ हजार रुपये

लागवड मजुरी ११ हजार रुपये

फवारणी खर्च १५ हजार रुपये

इतर ५ हजार रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT