The state of the fields that have been hailed due to unseasonal rains.  esakal
नाशिक

Unseasonal Rain Nashik : ढगाळ वातावरणाचा शेतकऱ्यांनी घेतला धसका; अवकाळीची अवकळा

सकाळ वृत्तसेवा

Unseasonal Rain Nashik : गेल्या चार-पाच दिवसांपासून रोजच अवकाळी पावसाने थैमान घातल्याने कसमादे भागातील शेतकऱ्यांनी पावसाचा धसका घेतला आहे. (unseasonal rain extensive damage to crops in region nashik news)

दिवसभर दमट हवामान व उष्मा आणि सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होत विजांचा कडकडाट अन वादळी वाऱ्यासह येणारा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांना रोजच धडकी भरवत आहे. या अवकाळीने या भागातील शेतमालांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवले आहे.

रब्बी पिकांमध्ये सध्या उन्हाळी कांदा, मिरची, टोमॅटो, तूर, डाळिंब, पपई अशी नगदी पिके तसेच, फळबागा व भाजीपालावर्गीय पिके जोमात आहेत. परंतु, रोजच येणारे ढगाळ वातावरण, अवकाळी पावसाची हजेरी काळजाचा ठोका चुकवणारी ठरत आहे.

पावसासोबत गारा पडत असल्याने शेतमालाचे व शेतीचे मोठे नुकसान होत आहे. डांगसौंदाणे, जोरण, करंजाड, निताने, आखतवाडे, बिजोटे, चिंचवे, तसेच चांदवड-नांदगाव तालुक्यातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

आधीच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरीवर्ग हैराण झालेला असताना या अस्मानी संकटाने शेतीचे कंबरडे मोडले आहे. आता यामुळे शेतीचा पोत खराब होऊन पुन्हा बुरशी चाल करणार असल्याने पिके कशी जगवावीत आणि यातून शेतकरी कसा सावरणार हा प्रश्न आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी पाहणी करत शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेतले.

आता याचे पंचनामे होऊन नुकसानभरपाई मिळणार असली तरी ती किती आणि कशी मिळणार हाही प्रश्न आहे. गारपीट झालेल्या गावांमधील शेतकऱ्यांशी संवाद साधला असता सारे काही शून्य झाल्याच्या प्रतिक्रिया नोंदवताना त्यांना अश्रू आवरता आले नाहीत.

अजून पुढील तीन दिवस पाऊस सांगितलेला असल्याने शेतातील पिके या अवकाळीपासून कशी वाचवावीत या विवंचनेत शेतकरी आहेत. आणि त्यामुळेच रोज दुपारनंतर आभाळाकडे पाहत वातावरण तयार होऊ लागले की शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठत असल्याचे दिसत आहे.

"बियाणे, मजुरी, खते-औषधे यावर केलेला खर्च आणि तितकेच कष्ट आणि घाम गाळत फुललेली शेती या अवकाळी पावसाने एका तासात उद्‌ध्वस्त करून टाकली. शेतातील कांद्याचे पीक व मिरची, टोमॅटोचे शेत पाहताना आम्हा शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा गारपिटीने चक्काचूर केला आहे. शिवारातील शेतकरी कुटुंबात यामुळे एक प्रकारची वैफल्यता आली आहे. आता यातून कसे सावरायचे हाच प्रश्न आहे." -दीपक वाघ, डांगसौंदाणे (ता. बागलाण)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT