Nashik Crime : लाखो रुपयांचा युरिया काळ्या बाजारात नेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत तो पकडला.
दरम्यान एकीकडे शेतकऱ्यांना युरीया मिळत नसताना दुसरीकडे काळ्या बाजारात विक्रीसाठी युरीया येतो कुठून, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Urea scam exposed in Niphad taluka 500 sacks seized by local crime branch Nashik Crime)
नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार निफाडला रात्री एकच्या सुमारास काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा युरिया ट्रकमधून नेला जात होता.
लासलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भरवस फाटा - नांदगाव रस्त्यावर एका वस्तीवर केंद्रशासन अनुदानित प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक परी योजना शिक्का असलेल्या एका गोणीतून दुसऱ्या खासगी गोणीत भरून ट्रकमधून (एमएच ः १८, बीएच १७८६) वाहतूक केला जात होता.
काळ्या बाजारातील भावानुसार २० लाख रुपयांच्या ४०० ते ५०० युरियाच्या गोण्या भरून ट्रक मुंबईत एका कंपनीत जात असताना निफाडला हा ट्रक पकडण्यात आला. एका संशयितासह चालक व क्लिनरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
शेतकऱ्यांना मुबलक युरिया मिळावा म्हणून केंद्राने प्रधानमंत्री भारतीय जनउर्वरक परी योजना चालू केली. या अंतर्गत शेतकऱ्यांना युरियाची गोणी २८० रुपयांना मिळते. शेतकऱ्यांना युरिया मुबलक मिळत नाही व घ्यायचा असल्यास आधारकार्ड लिंक करून घ्यावा लागतो.
कृषी परवानाधारक दुकानदार युरिया माफियाला गोणी २ हजार रुपयांना विक्री करतात, अशी माहिती मिळाली आहे. कृषि विभागाने नेमलेले भरारी पथक नेमके काय करते असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.