Removing the name from the plaque on the Shiv Sena Bhavan with the help of a crane. esakal
नाशिक

Nashik News : भाऊसाहेब चौधरींचे नाव हटवण्यासाठी क्रेनचा वापर! शिवसैनिकांची संतप्त प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून हकालपट्टी झालेल्या माजी संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांचे नाव फलकावरून हटविण्यासाठी शिवसेनेने क्रेनचा वापर करण्यात आल्याने शिवसैनिकांमधील संतापाची लाट तीव्र असल्याचे या निमित्ताने दिसून आले. जिल्ह्यात संपर्क नेते ही संघटनात्मक पातळीवर सर्वात मोठे पद आहे.

खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती भाऊसाहेब चौधरी यांच्याकडे संपर्क नेतेपदाची जबाबदारी होती. गेल्या चार वर्षांपासून जबाबदारी सांभाळताना भाऊसाहेब चौधरी यांनी ठराविक नेत्यांच्या कोंडाळ्यात राहून शिवसेना चालविली. (Use of crane to remove name of Bhausaheb Chowdhury Angry reaction of Shiv Sainiks Nashik political News)

ऐकीव माहितीच्या आधारे संघटना चालविताना चौधरी यांनी सर्वसामान्य शिवसैनिकाला दूर ठेवले. शिवसैनिकांमधील नाराजीचा विचार न करता वरिष्ठांनादेखील भाऊसाहेब चौधरी यांना सर्व निर्णयाचे अधिकार दिले. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वाढण्याऐवजी अधोगतीला गेली. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून आला नाही.

विधान परिषदेच्या निवडणुकीत यश मिळाले असले तरी ते यश उमेदवाराच्या वैयक्तिक ताकदीचे होते, असा आरोप शिवसैनिकांकडून केला जात आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वाधिकार असताना चौधरी यांनी शिंदे गट जवळ केला.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

शिंदे गटात प्रवेश करण्याची कुणकूण लागतात चौधरी यांची हकालपट्टी करण्यात आली. भाऊसाहेब चौधरी यांना सर्वाधिकार असताना त्यांनी घेतलेली भूमिका चुकीचे असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. चौधरी यांचा शिंदे गटात प्रवेश झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

त्याचे पडसाद शुक्रवारी (ता. २३) शिवसेना भवनावरील फलकावरून नाव काढण्यावरून दिसून आले. चौधरी यांचे फलकावरून नाव हटविण्यासाठी चक्क क्रेनचा वापर करण्यात आला. नाव हटविण्यासाठी टेरेसवरून झुला लावून सहजपणे नाव हटविता आले असते. मात्र, शिवसैनिकांमध्ये संताप इतका तीव्र आहे, की त्यांनी क्रेनच्या साहाय्याने नाव हटविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui case: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचणाऱ्या शुभम लोणकरच्या निशाण्यावर पुण्यातील बडा नेता; पोलिस तपासात धक्कादायक माहिती

Mumbai Temperature: मुंबईच तापमान पुन्हा वाढलं, कमाल तापमान ३६.८ अंशांवर

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

SCROLL FOR NEXT