Nashik News: बदलत्या काळानुसार जुने जाऊन नवे येत आहे. मात्र, अनेक जुन्याच गोष्टी पूर्वपरंपरापार चांगल्या असल्याचे बुजुर्गांनी सांगितले. ते खरे होत आहे. त्यामुळे मातीच्या भांड्यांचा वापर आरोग्यदायी असल्याने पुन्हा या भांड्यांकडे लोक वळाले आहेत.
मातीची भांडी स्वयंपाक बनविण्यासाठी वापर केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. भांडी किफायतशीर आहेत. मातीची भांडी चिकणमातीची बनलेली आहेत. त्यात सच्छिद्रपणा असतो.
त्यामुळे स्वयंपाक करताना उष्णता आणि आर्द्रता समान फिरते. मातीच्या भांड्यामध्ये अन्न हळूहळू शिजते. अन्नातील पौष्टिकता जशीच्या तशी राहते. खाद्यपदार्थ चवदार आणि आरोग्यदायी असतात. (Use of earthenware for healthy eating nashik news)
अन्नाला नैसर्गिक चव प्राप्त होते. मातीच्या भांड्यात अन्न शिजविल्याने जेवणाची चव वाढते. मातीच्या तव्यावर पोळी, चपाती करताना मातीचे तत्त्व त्यामध्ये शोषले जाते. त्यातून अन्नाची पौष्टिकता वाढते.
अन्नामध्ये फॉस्फरस, कॅल्शिअम, लोह, सल्फर आणि मॅग्नेशिअम समाविष्ट होते. ते शरीरासाठी फायदेशीर आहे. जेवण मातीच्या भांड्यात शिजवताना तेलाचा वापर कमी होतो. परिणामी, आल्मपित्ताचा विकार टळतो. पोटात वारंवार गॅस होत असल्यास आवर्जून मातीच्या भांड्यात शिजविलेले अन्न खाण्यास पसंती दिली जाते आणि अपचनासह गॅसची समस्या दूर होते. बध्दकोष्टतेच्या समस्येपासून आराम मिळतो.
मोठ्या कालखंडानंतर काही मंडळी मातीच्या भांड्यांची मागणी करीत आहेत. विशेष म्हणजे ऑनलाइन खरेदीमध्ये मातीचा कुकर विक्रीस उपलब्ध झाला आहे. अनेक जण चांगल्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा शोध घेत असतात. त्यामुळे मातीच्या भांड्यांची मागणी हळूहळू वाढायला लागली आहे.
हंडी, कढई असं बरेच काही...
मातीपासून पाण्याचा माठ नाही, तर भाजी बनविण्याची हंडी, कढई, तवा, प्लेट, वाटी, चमचा, ग्लास, बाटली, जग अशा विविध वस्तू बनविल्या जात आहेत. स्टीलच्या अथवा ॲल्युमिनिअमच्या भांड्यांऐवजी मातीची भांडी वापरण्यातून स्वयंपाकगृहाला पारंपारिक ‘लुक’ येतो. मातीची भांडी पर्यावरणपूरक आहेत. त्याची विल्हेवाट सोप्या पद्धतीने लावता येते.
"आधुनिक युगात सर्वत्र यांत्रिक पद्धतीच्या वस्तू जीवनशैलीत वापरल्या जातात. गेल्या तीन पिढ्यांपासून हा व्यवसाय आम्ही करतो. माती व शेणाचे महत्त्व अबाधित आहे. ज्यांना जाण आहे, अशी मंडळी, आरोग्य क्षेत्रातील अनेक जण या भांड्यांची मागणी करतात. तुटफूट म्हणून न बघता आरोग्यदायी म्हणून काळजीपूर्वक वापरल्यास योग्य आहे." - नरेंद्र बोरसे, मातीच्या भांड्यांचे विक्रेते
"मातीच्या भांड्यांमधील शिजवलेल्या अन्नात शंभर टक्के पोषक तत्त्वे व पाचकता मिळते. भात व डाळी कुकरऐवजी मातीच्या भांड्यात शिजविल्यास शरीरासाठी सर्व घटक मिळतात. दैनंदिन आहार शिजविताना ही भांडी कुठल्याहीदृष्टीने त्रासदायक नसतात. आयुर्वेदात विशेष महत्त्व आहे." - डॉ. शुभांगी बरंठ, मालेगाव
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.