child vaccination esakal
नाशिक

नाशिक जिल्ह्यात 9 हजार मुलांना एकाच दिवशी पहिली लस

महेंद्र महाजन

नाशिक : कोरोना (Corona) प्रतिबंधक १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना लसीकरण (Vaccination) करण्यासाठी आता लस ग्रामीण भागात पोचली. आज सायंकाळपर्यंत एका दिवसामध्ये जिल्ह्यातील ८ हजार ६३८ मुलांचे पहिले लसीकरण झाले. आजअखेर एकूण दहा हजार ९१२ मुलांना लस देण्यात आली असून दोन हजार २७४ मुले नाशिक शहरातील आहेत. ग्रामीण-आदिवासी भागामध्ये शाळांमधून लसीकरण सुरू करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु असल्याने परीक्षा असलेल्या व्यतिरिक्तच्या शाळांवर विभागाने लक्ष केंद्रित केले आहे.

आतापर्यंतची लसीकरणाची स्थिती

नाशिक आणि मालेगाव शहरासह जिल्ह्यातील एकूण ८१८ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यातील ३५ केंद्रे नाशिक, तर २९ केंद्रे मालेगाव शहरातील आणि उर्वरित ७५४ केंद्रे ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागातील एकूण ४५ लाख १२ हजार ४०२ लोकसंख्येपैकी १८ वर्षांवरील ३३ लाख १५ हजार ७१३ जणांमधील २८ लाख ९९ हजार ८०७ म्हणजेच, ८७.४६ टक्के जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. तसेच २२ लाख ९० हजार ८५२ म्हणजेच ६९.०९ टक्के जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच नाशिक शहरातील एकूण १८ लाख ५५ हजार ९१० लोकसंख्येपैकी १८ वर्षांवरील १३ लाख ६३ हजार ७२३ जणांमधील १२ लाख ८३ हजार २८ म्हणजे ९४.०८ टक्के जणांना पहिला, तर १० लाख ४३ हजार ५६९ म्हणजे ७६.५२ टक्के जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. मालेगाव शहरातील एकूण सहा लाख ७५ हजार ६३३ लोकसंख्येपैकी १८ वर्षांवरील चार लाख ९६ हजार ४५४ जणांपैकी तीन लाख १६ हजार ६०३ म्हणजे ६३.७७ टक्के जणांना पहिला व एक लाख तीन हजार १७५ म्हणजे २०.७८ टक्के जणांना दुसरा डोस दिला आहे. अशा एकूण जिल्ह्यातील ७० लाख ४३ हजार ९४३ लोकसंख्येपैकी १८ वर्षांवरील ५१ लाख ७५ हजार ८८९ जणांपैकी ४४ लाख ९९ हजार ४३८ जणांना म्हणजेच ८६.९३ टक्के पहिला, तर ३४ लाख ३७ हजार ५९६ अर्थात, ६६.४२ टक्के जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

शहर आणि जिल्ह्यातील आतापर्यंतची लसीकरण झालेल्यांची संख्या अशी : आरोग्य आणि इतर कर्मचारी-पहिला डोस एक लाख ९३ हजार ८०९, दुसरा डोस एक लाख ७८ हजार ५३९, बूस्टर डोस-४३ हजार ७००. १५ ते १७ वर्षे वयोगटातील मुले-पहिला डोस दोन लाख ३ हजार ७०३, दुसरा डोस एक लाख २४ हजार २५७. १८ ते ४४ वर्षे वयोगट-पहिला डोस-२७ लाख १६ हजार ८६८, दुसरा डोस-१९ लाख ६३ हजार ४४३. ४५ ते ६० वर्षे वयोगट-पहिला डोस नऊ लाख ३८ हजार ९०५, दुसरा डोस सात लाख ६५ हजार ६०५. ६० वर्षांवरील-पहिला डोस सहा लाख ४१ हजार ७५५, दुसरा डोस पाच लाख १७ हजार ८३१, बूस्टर डोस-४६ हजार १५८. शह व जिल्ह्यात एकूण-पहिला डोस-४७ लाख पाच हजार ९५२, दुसरा डोस ३५ लाख ४९ हजार ६७५, बूस्टर डोस ८९ हजार ८५८. शहर-जिल्ह्यातील एकूण डोस ८३ लाख ४५ हजार ४८५.

तालुकानिहाय लसीकरण

(१८ वर्षांवरील लोकसंख्येसाठी डोसची टक्केवारी)
तालुक्याचे नाव पहिला डोस दुसरा डोस
नाशिक ९५.५३ ८२.०१
दिंडोरी ९२.८४ ८१.२०
त्र्यंबकेश्‍वर ८८.४३ ६३.२६
इगतपुरी ९२.८५ ६९.४४
निफाड ८८.१३ ७८.८६
चांदवड ८७.९३ ६७.३८
सिन्नर ८८.५२ ७१.९७
कळवण ८३.९८ ६४.२६
मालेगाव ८७.७४ ६९.१०

पेठ ८९.४५ ६७.३०
देवळा ९३.०३ ७९.९४
बागलाण ८३.७७ ६७.०९
येवला ८४.६५ ५६.४५
नांदगाव ७८.९० ५४.१०
सुरगाणा ७७.९२ ४९.९६

(लसीकरणाच्या आकडेवारीवरुन नाशिक अन दिंडोरीचा अपवाद वगळता जिल्ह्यात इतरत्र दुसऱ्या डोसच्या लसीकरणाला वेग द्यावा लागणार असल्याचे स्पष्ट होते.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT