Officials of BJP and Shinde group while welcoming the Vande Bharat train at the railway station. esakal
नाशिक

Vande Bharat Express : ‘वंदे भारत’चे नाशिकला जोरदार स्वागत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुंबई- शिर्डी वंदे भारत रेल्वेचे शुक्रवारी (ता. १०) नाशिक रोडला जोरदार स्वागत झाले. या गाडीतून पहिल्या दिवशी प्रवास करण्याचा पहिला मान सरकारी शाळेतील दिडशे मुलांना मिळाला. (Vande Bharat Express gets warm welcome to Nashikroad railway station nashik news)

ताशी वेग १६० किमी वेगाच्या असणाया ट्रेन सांयकाळी सातला आली. पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे, देवयानी फरांदे, शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते आदींसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

पहिल्या प्रवासासाठी सर्व ११२८ तिकिटे मोफत देण्यात आली होती. यापैकी भुसावळ विभागाने ६०० तिकिटे जारी केली होती. माध्यम प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, डॉक्टर, इंजिनिअर, उद्योजक, स्टेशन मास्तर, ट्रॅक मेंटेनर, कोच व एसी मेकॅनिक, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन कर्मचारी, ट्रेनमधील रेल्वे डॉक्टरांचा समावेश होता.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

मंगळवार वगळता आठवड्यातील सहा दिवस ही ट्रेन धावेल. मुंबई- शिर्डी, मुंबई- सोलापूर या दोन ट्रेननंतर आणखी दोन ट्रेन लवकरच सुरू होणार आहेत. पुढील वर्षी दर आठवड्याला २-३ तर तीन वर्षात चारशे वंदे ट्रेन सुरु करण्याचे नियोजन आहे.

प्रत्येक बोगीत ३२ प्रवासी, चार संकटकालीन खिडक्या, बाहेरील व मागील दृश्ये पाहण्यासाठी विशेष कॅमेरे, अग्नीशोधन व अग्निशमन सुरक्षा, सेमी हायस्पीड सेल्फ प्रोपेल्ड ट्रेन. १६० किमी वेग अवघ्या १२९ सेकंदात गाठते. मागून इंजिन (बॅंकर) न लावता कसारा व अन्य घाट पार करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT