Students studying Vedas at Kailasa Math esakal
नाशिक

कैलास मठात विद्यार्थ्यांना वेदाचे धडे; हिंदू संस्कृती पुढे नेण्याची परंपरा

योगेश मोरे

पंचवटी (जि. नाशिक) : प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमी पंचवटीतील पेठ रोडवरील कैलास मठात देशभरातील शेकडो विद्यार्थी वेद शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले तब्बल दीड हजार विद्यार्थी आजपावेतो वेद शिक्षणात पारंगत होऊन बाहेर पडले आहेत. (Veda lessons to students Kailas Math tradition of carrying forward Hindu culture Nashik Latest Marathi News)

१९१८ मध्ये स्वामी हृदयानंद सरस्वती यांनी कैलास मानसरोवराची पदयात्रा केली होती. मानसरोवर येथे त्यांना स्फटिकाचे शिवलिंग मिळाले. ते शिवलिंग त्यांनी नाशिकला आणले अन् शिवमंदिर उभारले. दोन वर्षांनंतर १९२० मध्ये त्यांनी कैलास मठाची स्थापना केली. १९७४ मध्ये कैलास मठ ट्रस्ट स्थापन केले. तेव्हापासूनच स्वामीजींनी मठात वेद शिक्षण सुरू केले. अनेक विद्यार्थ्यांना उपनिषद, वेद, शुक्ल यजुर्वेद, गीता, विष्णू सहस्त्रनाम, शिवमहिम्न, रुद्रपाठ आदी अभ्यासांचे शिक्षण देण्यात आले.

१९९५ पासून स्वामी अखंडानंदजी सरस्वती यांच्या नावाने वैदिक विद्यालय सुरू झाले. हे विद्यालय महर्षी संदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठानचे वेदिक बोर्ड आहे. येथे इयत्ता पाचवीनंतर प्रवेश दिला जातो. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सर्व सुविधा दिल्या जातात. एकूण सात वर्षे शिक्षण चालते. या विद्यार्थ्यांना वेद आणि संस्कृत, सामान्यज्ञान, विज्ञान, गणित, इंग्रजी आदी विषयांचे शिक्षण दिले जाते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर बारावीसारखे प्रमाणपत्र दिले जाते.

यांनी चालविली कैलास मठाची परंपरा

स्वामी हृदयानंद सरस्वती यांच्यानंतर स्वामी मुरलीधरानंद, स्वामी अनुभवानंदजी, स्वामी मोहनानंदजी, स्वामी अखंडानंद सरस्वतीजी, स्वामी विद्यानंद सरस्वती, स्वामी सविदानंद सरस्वती परंपरा पुढे चालवीत आहेत.

या राज्यांतून येतात विद्यार्थी

नाशिकमधील प्रसिध्द कैलास मठात शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, मध्यप्रदेश आदी राज्यांतून दरवर्षी शेकडो विद्यार्थी येतात.

असे होते अध्ययन

वैदिक शिक्षणात हिंदू धर्म वेदांसह गीता, विष्णू सहस्त्रनाम, गीता अध्ययन, रामचरित्र, शिवचरित्र, विष्णू चरित्र, देवी-देवतांचे अध्ययन केले जाते.

भव्यदिव्य कार्यक्रमांचे आयोजन

कैलास मठात दरवर्षी श्रावण मासात अनुष्ठान चालते. रूद्रपाठ घेतला जातो. फलार्चनाचा भव्यदिव्य सोहळा रंगतो. शिवमहिम्न स्तोत्र, सहस्त्र शिवनामावली, लिंगाष्टक स्तोत्र, शिवाष्टक स्तोत्र, शिवनामावली घेतली जाते.

शिवसेवा से जीवसेवा

श्रावण मासात फलार्चनाचे केले जाते. ही फळे महिनाभर आदिवासी पाडे, त्र्यंबकेश्वर, आश्रमशाळा, शासकीय रुग्णालय, नामको हॉस्पिटल, टीबी हॉस्पिटल, गणेश वाडीतील आयुर्वेदिक रुग्णालय, सुयश, संजीवनी या खासगी रुग्णालयात व तपोवनातील बेघरांना दिली जातात. ‘शिवसेवा से जीवसेवा’ हे ब्रीद वाक्य घेऊन ‘कुपोषणमुक्त भारत’ या अभियानांतर्गत कुपोषित मुले व गर्भवती महिलांना फळवाटप केले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT