नाशिक : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार- जीवनकार्य जागतिक स्तरावर पोचविण्यासाठी राज्यात देशातील पहिले वीर सावरकर पर्यटन सर्किट निर्माण केले जाईल. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगूर (जि. नाशिक) येथे सावरकर थीम पार्क आणि संग्रहालय उभारण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाने त्यासाठी पुढाकार घेतला असून, रविवारी (ता. २६) स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त भगूर येथे अभिवादन पदयात्रा व कार्यक्रम पर्यटन विभागातर्फे होईल. (Veer Savarkar Tourism Circuit countries first Veer Savarkar tourism circuit will be construct in state nashik news)
भगूरमधील सावरकर वाड्यामधील मुख्य कार्यक्रमास राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती असेल. खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज अहिरे यांच्यासह इतर उपस्थित राहणार आहोत.
रविवारी सकाळी आठला भगूरमधील नूतन विद्यालय ते सावरकर वाडा अशी अभिवादन पदयात्रा होईल. पदयात्रेत अष्टभुजादेवी पालखी सहभागी असेल. त्यानंतर सकाळी नऊला सावरकर वाड्यामध्ये गायक चारुदत्त दीक्षित व सहकलाकारांचे स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित गीतांचे गायन, योगेश सोमण लिखित-दिग्दर्शित ‘सावरकर आणि मृत्यू’ या संवादाचे बद्रीश कट्टी व आदित्य धलवार यांचे अभिवाचन, सन्मान असे कार्यक्रम होतील.
या वेळी भगूरमधील पर्यटन विभागाच्या माध्यमातून देशातील पहिल्या ‘वीर सावरकर पर्यटन सर्किट’ची घोषणा करण्यात येणार आहे. तसेच भगूर येथे होत असलेले ‘थीम पार्क’ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरित करून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचार-दर्शनावर आधारित ‘थीम पार्क' व संग्रहालयाची उभारणी करण्यात येणार आहे.
श्री. लोढा या कार्यक्रमात संवाद साधणार आहेत. राष्ट्रासाठी असीम त्याग व समर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना, त्यांच्या विचार व कार्याला या पदयात्रा व कार्यक्रमाच्या निमित्ताने मानवंदना देण्यात येणार आहे.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
त्यामुळे भगूर, नाशिक शहर, जिल्ह्यासह विविध ठिकाणांहून अधिकाधिक सावरकरभक्त नागरिक, कार्यकर्त्यांनी या वेळी उपस्थित राहावे, असे महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग, तसेच अन्य सहयोगी संस्था-संघटनांच्या वतीने सांगण्यात आले.
भगूरच्या सावरकर वाड्याचे स्थान माहात्म्य
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ ला भगूरमधील सावरकर वाड्यात झाला. बालपणापासून राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेल्या सावरकरांनी याच वाड्यात वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी घराच्या देव्हाऱ्यातील शंख, चक्र, गदा, खड्गधारी अष्टभुजा देवीच्या मूर्तीसमोर ‘सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन’, अशी शपथ घेतली होती.
त्यानंतर पुढे सावरकरांचे क्रांतिकार्य, सामाजिक सुधारणेचे कार्य, काव्य व साहित्यातील योगदान व राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी केलेला असीम त्याग, समर्पण, सोसलेल्या हालअपेष्टा जगापुढे आहेत. भगूर व सावरकर वाडा ही स्थाने महत्त्वाची आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.