Nashik News : टोमॅटोपाठोपाठ भाजीपाल्यांच्या दराला बुधवारी (ता. ६) उतरती कळा लागली. भाजीपाल्यांच्या प्रतिक्रेटला ३० ते ५० रुपये मातीमोल भाव व्यापाऱ्यांनी पुकारल्याने संतप्त शेतकऱ्यांनी भाजीपाल्यांचे लिलाव बंद पाडले.
बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. दुष्काळाच्या झळा सोसत पिकविलेल्या भाजीपाल्याचा उत्पादन खर्चही फिटणार नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटल्या.
पिंपळगाव बाजार समितीचे संचालक यतीन कदम ठिय्या आंदोलनाला सामोरे जात शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. (Vegetable prices tumbled Farmers agitation Pimpalgaon market committee closed auction Nashik News)
मंगळवारी (ता. ६) सायंकाळी टोमॅटोच्या दराने नीचांकी ८० रुपये प्रतिक्रेट दर गाठल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर टोमॅटो फेकून निषेध करीत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
टोमॅटोचे दर कोसळल्याची जखम ताजी असताना, बुधवारी सकाळी भाजीपाला लिलाव सुरू झाले. वांगे, कोबी, ढोबळी मिरची, घेवडा, दोडके, मिरची, असा भाजीपाला घेऊन शेतकरी आले होते.
भाजीपाल्यांच्या प्रतिक्रेटला २० ते ५० रुपये म्हणजे एक ते दोन रुपये प्रतिकिलो दर पुकारला. टोमॅटोच्या दर कोसळल्याच्या जखमेवर भाजीपाल्याला कवडीमोल भाव पुकारून मीठ चोळले गेले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
शेतकऱ्यांचा ठिय्या
भाजीपाल्यांचे दर २० रुपये प्रतिक्रेट पुकारल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली. बाजारभावावरून शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. संतप्त शेतकऱ्यांनी थेट लिलाव बंद पाडत बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयावर धडक दिली.
मंगळवारपर्यंत सरासरी १५० रुपये प्रतिक्रेटचा भाव भाजीपाल्याला पुकारला जात होता. तो अचानक शंभर रुपयांनी खाली आल्याने शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले. शेतकऱ्यांनी थेट प्रशासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर भाजीपाला घेऊन ठिय्या आंदोलन सुरू केले.
शेतकऱ्यांसमवेत बाजार समितीचे संचालक यतीन कदम यांनी ठिय्या दिला. श्री. कदम यांनी व्यापाऱ्यांना बाजारभाव कोसळण्याचे कारणे विचारली. त्यावर भाजीपाल्याला अपेक्षित मागणी नसल्याचे कारण व्यापाऱ्यांनी दिले.
अखेर हतबल शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात भाजीपाला विकावा लागला. दरवाढ झाल्यावर शासन हस्तक्षेप करते. आता भाव कोसळल्यावर का दुर्लक्ष करीत आहात, असा सवाल शेतकऱ्यांनी या वेळी विचारला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.