Nashik ZP News: कालबाह्य झालेले दिव्यांग प्रमाणपत्र व अल्पदृष्टी असताना चारचाकी वाहन चालवत असलेल्या ग्रामविकास अधिकारी संजय पाटील यांच्या बदली प्रकरणी इगतपुरी तालुक्यातील आरती दिव्यांग सेवाभावी संस्थेने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे तक्रार केली आहे. (Verification of certificates of disabled employees under zp nashik news)
त्यानुसार त्यांनी जिल्हा परिषदेंतर्गत असलेले सर्व दिव्यांग कर्मचारी, ग्रामसेवक, शिक्षक, अधिकारी यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्याच्या सूचना सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तक्रादारांच्या अर्जावर कार्यवाहीच्या सूचनाही ग्रामपंचायत विभागाला दिल्या आहेत.
संस्थेने तक्रारीत म्हटले आहे, की संजय भावसिंग पाटील मखमलाबाद (दिंडोरी) येथे ग्रामविकास अधिकारी असून, दिव्यांग (अल्पदृष्टी) असल्याने त्यांच्या विनंती अर्जानुसार त्यांना सिन्नर-माळेगाव येथे बदलीचे आदेश जिल्हा परिषदेने दिले. यातील ग्रामविकास अधिकाऱ्यांची पदस्थापना झाल्याशिवाय त्यांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये, असे म्हटले असताना दुसऱ्याची नियुक्ती न करता तात्पुरता पदभार दिला गेला.
दिव्यांगांच्या हक्काच्या शासकीय जागा बनावट दिव्यांग घेत असल्याचा आरोपही संस्थेने केला आहे. श्री. पाटील यांच्याकडे चारचाकी वाहन असून, ते स्वतः चालवत दिंडोरी, नाशिक व माळेगाव येथे ये-जा करत आहेत. त्यांना २१ मे २०२३ दरम्यान नाशिक पोलिसांनी दंडही केला होता. तसे पुरावे व वाहन परवाना आणि कालबाह्य झालेले प्रमाणपत्र अर्जाला जोडले आहे.
जर ते अल्पदृष्टी आहेत, तर त्यांना वाहन चालवण्याचा परवाना मिळाल कसा? त्यांना बनवाट कागदपत्राद्वारे दिव्यांग असल्याचा खोटा लाभ घेतल्याचा आरोपही संस्थेने केला आहे. दरम्यान, या प्रकरणी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
"दिव्यांग संस्थेने केलेल्या तक्रारीनुसार जिल्हा परिषदेच्या सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांचे शासकीय दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. दिव्यांग बांधवांवर अन्याय होऊ देणार नाही." - आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.