While verifying drug stocks in primary health centers Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar. Neighboring medical officers and staff.  esakal
नाशिक

Dr Bharti Pawar : डॉ. भारती पवारांकडून मुखेडला झाडाझडती; समिती नियुक्त होऊन चौकशी सुरू

सकाळ वृत्तसेवा

Dr Bharti Pawar : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांसह उपकेंद्रांच्या कामकाजाबाबत नाराजी असताना सोमवारी (ता.१०) केंद्रीय कुटुंबकल्याण व आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मुखेड (ता. येवला) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला दिलेल्या भेटीत रजिस्टर, औषधसाठ्याची तपासणी केली. (Verification of drug stock and available drug stock received by dr Bharti Pawar nashik news)

त्यात महिलांसाठी असलेल्या सॅनिटरी नॅपकिनचे वाटप झालेले नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी तत्काळ दखल घेत अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. राजेंद्र बागूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करत चौकशीचे आदेश दिले. समितीने मंगळवारपर्यंत (ता. ११) अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

मंत्री डॉ. पवार सोमवारी येवला तालुका दौऱ्यावर होत्या. डॉ. पवार यांनी अचनाक मुखेडला भेट दिली. त्यात रुग्णतपासणी रजिस्टरची तपासणी केली. त्यानंतर प्राप्त औषधसाठा व उपलब्ध औषधसाठा याची पडताळणी केली. येथे दाखल झालेल्या काही रुग्णांशी संवाद साधत आरोग्य सेवेबाबत विचारणा केली.

यात रुग्णतपासणी रजिस्टर नोंदणीमध्ये अनियमिता आढळून आली, तर औषधासाठ्याबाबत अनियमितता दिसली. महिलांना वाटपासाठी असलेल्या सॅनिटरी नॅपकिनचे वाटप झाले नसल्याचे निर्देशनास आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यावर डॉ. पवार यांनी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची कानउघडणी करत रुग्णांना चांगली आरोग्यसेवा देण्याच्या सूचना केल्या.

आरोग्य कामात हलगर्जी होता कामा नये, असा इशाराही या वेळी दिला. तसेच याबाबत श्रीमती मित्तल यांच्याकडे तक्रार केली. त्याची तत्काळ दखल घेण्यात आली. नियुक्त समिती आरोग्य केंद्रावर पोचली असून, तपासणी करत आहे. तपासणी केलेला अहवाल मंगळवारी सादर होण्याची शक्यता आहे.

"मुखेड आरोग्य केंद्रातील कामकाजात अनियमितता दिसून आली आहे. औषधे असो की सॅनिटरी नॅपकिनचे वितरण करण्यात आलेले नाही. कामकाज असमाधानकारक असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. आरोग्य सेवेने सर्तक राहण्याच्या सूचना केल्या आहेत." - डॉ. भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : 'परिवर्तन महाशक्ती'च्या आणखी २८ जागांची निश्चिती; स्वराज्य पक्ष, प्रहार पक्ष आजच आपल्या उमेदवारांच्या नावाची करणार घोषणा

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT