नाशिक

विद्रोही मराठी साहित्य संमेलन आदिवासी, कष्टकऱ्यांचे!

शिवव्याख्याते डॉ. श्रीमंत कोकाटे यांचे प्रतिपादन

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विद्रोही मराठी साहित्य संमेलन आदिवासी, कष्टकरी माणसांचे संमेलन आहे. महाराष्ट्र सरकारचे पैसे खाऊन महाराष्ट्र विसरणारे हे संमेलन नसून, हे महाराष्ट्र शासनाकडून एक रुपयाही न घेता अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारे संमेलन आहे, असे प्रतिपादन शिवचरित्रकार तथा इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी रविवारी (ता. ५) केले.

संविधान सन्मानार्थ मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या आवारातील अभिनव विकास बालमंदिराच्या प्रांगणात आयोजित १५ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र स्थापनेच्या हीरकमहोत्सवानिमित्त ‘गर्जतो महाराष्ट्र माझा’ या विषयावर विशेष व्याख्यान देताना ते बोलत होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष गणेश उन्हवणे, गुलामभाई शेख आदी व्यासपीठावर होते.

डॉ. कोकाटे म्हणाले, की महाराष्ट्रातील जंतांना ठेचायचे असेल तर एक होणे गरजेचे आहे. विद्रोही संमेलन छत्रपतींचा वारसा सांगणाऱ्यांचे संमेलन आहे. जातिभेद, प्रांतभेद जे मानत नाही, ते लोक म्हणजे मावळे आणि हे संमेलन मावळ्यांचे आहे. छत्रपतींनी असे मावळे तयार करण्याचे काम केले. पाषाणयुगापासून महाराष्ट्राला इतिहास आहे. महाराष्ट्राला ताम्रपाषाण युगाचाही इतिहास असल्याचे नमूद करीत महाराष्ट्राला बुद्धांच्या संस्कृतीचा वारसा असल्याचे सांगितले.

महाराष्ट्राला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळावा, ही सर्वांचीच मागणी आहे. मात्र, त्यासाठी दिल्लीत जाऊन भांडणारा एकही नेता नाही, हे दुर्दैव आहे. विविध विचारधारा, संस्कृतीने नटलेला हा महाराष्ट्र आहे. पेशव्यांना पराभूत करणारा इतिहास महिलांनी लिहिला आहे. बांगड्या परिधान करणे म्हणजे महिला दुबळी आहे, असे समजण्याची गरज नाही. महात्मा फुले यांच्यासोबत सावित्रीबाई फुले यांनी काम केले, हा इतिहास प्रत्येकामध्ये रुजविण्याची गरज श्री. कोकाटे यांनी व्यक्त केली.

फुले यांच्या नावाने व्हावा शिक्षक दिन

पेशव्यांनी दलित, शेतकरी, महिलांचा छळ केला आहे. शेतकऱ्यांकडून खंडणी गोळा करणारी ही पेशवाई जमात कलंक असून, त्याविरोधात लढण्याचे काम महात्मा फुले यांनी केले आहे. पेशव्यांनी त्यांच्या राजवटीत सामान्यांवर मोठे अत्याचार केले. महाराष्ट्रातील पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले असताना सरस्वतीचे पूजन केले जाते. एकही शाळा सुरू न करणाऱ्यांच्या नावे शिक्षक दिन साजरा होतो, पण आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार महात्मा फुले असताना त्यांच्या नावे शिक्षक दिन का नाही, असा सवाल कोकाटे यांनी उपस्थित केला.

ठळक मुद्दे

  1. चटणी, भाकर खाऊन खरे बोलणाऱ्यांचे संमेलन.

  2. माणसाच्या आहाराची जोड धर्मास देणे दुर्दैवी.

  3. शिक्षणाचा अधिकार आणि आजच्या उर्मट प्रथा पुरातन काळात नाकारणारे तुकाराम महाराजांचे विचार मांडले.

  4. जनतेचा नव्हे तर संतांचा महाराष्ट्र अशी राज्याची ओळख.

  5. आरक्षण हक्क, अधिकार आहे, भीक नाही.

  6. राज्य आणि केंद्र सरकार भांडवलदारांच्या हाती सत्ता देण्याचे काम करत आहे.

  7. एसटी महामंडळ कामगारांना न्याय मिळावा. त्यांचे सरकारीकरण व्हावे. त्यांना आमचा पाठिंबा.

  8. सरकार खासगीकरणाचा घाट घालत आहे.

  9. शिवकाळात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या नाही.

  10. आताही पेशवाई आणि मोगलशाही सुरू आहे.

शाहू, फुले, आंबेडकरी विचारांची गरज

जिथल्या माणसाची भाषा हीच व्याकरण आहे, ती खरी भाषा. महात्मा फुले यांच्या साहित्यात व्याकरण नसेल पण जनमाणसाचे अंतःकरण आहे. हे लक्षात घ्यावे. महात्मा फुलेच खरे शिवशाहीर असून, माणूस किती वर्षे जगला यापेक्षा जगून काय केले, हे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र गरजण्यासाठी शाहू, फुले, आंबेडकरी विचारांची गरज आहे, असे डॉ. कोकाटे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT