A team of Municipal Corporation Miscellaneous Tax Collection Department sealing the gutters of Sonia Gandhi Market in the city. esakal
नाशिक

Nashik News : कर वसुलीसाठी महापालिकेची जोरदार मोहीम; 14 गाळ्यांना ठोकले सील

महापालिका प्रशासनाला मालमत्ता, नळपट्टी व संकीर्ण कर वसुलीचे उद्दिष्ट मार्चअखेर पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महापालिका प्रशासनाला मालमत्ता, नळपट्टी व संकीर्ण कर वसुलीचे उद्दिष्ट मार्चअखेर पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आहे. महापालिकेने वसुलीसाठी थकबाकीदारांना दंड व्याजात सवलत व जप्ती कारवाई सुरु केली होती.

या मोहिमेचाच भाग म्हणून गुरुवारी (ता. ८) अली अकबर रुग्णालयानजीकच्या सोनिया गांधी मार्केटजवळील १८ पैकी १४ गाळे धारकांना थकबाकी असल्याने सील ठोकण्यात आले. (Vigorous campaign of Municipal Corporation for tax collection nashik news)

गेल्या महिन्यात मराठा सर्वेक्षणाचे काम आल्याने वसुलीला पुन्हा खोडा बसला होता. तसेच उद्दिष्ट पूर्ण करण्यात सातत्याने अडचणी येत आहेत. त्यातच विविध योजनांमुळे महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने कर वसुलीसाठी फेब्रुवारीत जोरदार मोहीम सुरु करण्यात आली आहे. महापालिकेने थकबाकी वसुलीसाठी कठोर कारवाई सुरु केल्याने थकबाकी धारकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

शहरात मनपा मालकीचे असंख्य शॉपिंग व हॉकर्स गाळे आहेत. संबंधित संकुल व गाळेधारक मनपाचे भाडे व संकीर्ण कर अदा करण्यात सातत्याने टाळाटाळ करतात. घरपट्टी, पाणीपट्टी बरोबरच संकीर्ण कर वसुली विभागाकडेही आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांनी वक्र दृष्टी टाकली आहे.

श्री. जाधव यांनी कर्मचाऱ्यांना थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करतानाच कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. यातूनच सोनिया गांधी मार्केट जवळील एकूण १८ हॉकर्स गाळेधारकांपैकी १४ गाळ्यांना गुरुवारी (ता.८) सील ठोकण्यात आले. या चौदा गाळेधारकांकडे संकीर्ण कराची एकत्रित ८ लाख ४७ हजार ६६१ रुपये थकबाकी होती.

गाळे सील झाल्याने संबंधित व्यावसायिकांचा थेट व्यवसायच बंद झाला आहे. त्या पाश्‍र्वभूमीवर शहरातील मनपाच्या मालकीचे सर्व गाळेधारक, संकुलधारकांनी शॉपिंग भाडे व हॉकर्स भाडे थकबाकीचा भरणा संकीर्ण कर वसुली विभागाकडे तातडीने करावा.

मनपाचा इशारा

शहरातील थकबाकीदार यांनी थकीत रक्कमेचा भरणा करून मनपास सहकार्य करावे. अन्यथा थकबाकीदारांची शॉपिंग, हॉकर्स गाळे सील बंद करण्याचा इशारा प्रशासनाने दिला. व्यावसायिकांनी थकबाकी भरुन कटू कारवाई टाळावी असे आवाहन आयुक्त श्री. जाधव यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT