Vijay Wadettiwar  esakal
नाशिक

Ajit Pawar: "बेटा अजित कितना खाया..?"; वडेट्टीवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली तर मिटकरींचे शोले स्टाईल उत्तर

Sandip Kapde

चांदवड (नाशिक) : विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जोरदार खिल्ली उडवली आहे. चांदवड येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना वडेट्टीवार यांनी "बेटा अजित कितना खाया..? सरदार ७० हजार कोटी..बहुत खाया..ये ले तिजोरी की चाबी रख.." असे म्हणत अजित पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र टीका केली.

शेतकरी मेळाव्यातील जोरदार भाषण-

विजय वडेट्टीवार नाशिकच्या चांदवड येथे माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली आणि त्यांच्या विविध निर्णयांवर टीका केली. वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करताना सत्ताधारी पक्षाच्या धोरणांची खिल्ली उडवली.

अमोल मिटकरींचे शोले स्टाईल उत्तर-

वडेट्टीवारांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शोले'च्या स्टाईलमध्ये पलटवार केला. "क्योरें सांभा चंद्रपूर में दारू बंद करने के लिए कितने खाये..? और कितने आदमी थे.." असा शोलेच्या डायलॉग'मध्ये उत्तर देत त्यांनी वडेट्टीवारांना प्रत्युत्तर दिले. मिटकरी म्हणाले की, "शोलेच्या माध्यमातून आम्हाला बोलायला लावू नका. वडेट्टीवारांनी तोंड आवारावं."

राजकीय वातावरण तंग-

या टोमण्यामुळे राजकीय वातावरण आणखीनच तंग झाले आहे. वडेट्टीवार आणि अमोल मिटकरी यांच्या या आरोप-प्रत्यारोपामुळे राज्यातील राजकीय नेत्यांमध्ये खळबळ माजली आहे. या टीका-टिपण्णींमुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण कसे राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

Arjun Tendulkar ची भेदक गोलंदाजी; एकाच सामन्यात ९ विकेट्स घेत संघाला डावाने जिंकवलं; पाहा Video

महामंडळाचा प्रसाद फक्त शिंदे गटाला? हेमंत पाटलांसह संजय शिरसाटांवर नवी जबाबदारी; नाराज आमदारांचे राजकीय पुनर्वसन

Kush Maini: धक्कादायक! भारताचा फॉर्म्युला-2 रेसर अपघातादरम्यान थोडक्यात बचावला, दुर्घटनेदरम्यानचा Video आला समोर

Manchar News : पुणे-नाशिक औद्योगिक राष्ट्रीय महामार्ग होणार रद्द; सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

SCROLL FOR NEXT