येवला (जि. नाशिक) : नगर-मनमाड महामार्गावर नांदेसर व बदापूर शिवालगत असलेल्या कृष्णा एन्झोटेक या कंपनीच्या बाहेर पडणाऱ्या रसायनामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीत रसायनयुक्त द्रव्यांचा पाझर होऊन शेतीचे नुकसान होत आहे.
तसेच पिण्याचे पाणी दूषित होऊन ग्रामस्थांना विविध आजार होत असल्याने शेतकऱ्यांच्या विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा गंभीर आरोप करत दोन्ही गावच्या शेतकऱ्यांनी ही कंपनी कायमस्वरूपी बंद करण्यासाठी बेमुदत उपोषण केले. आज तिसऱ्या दिवशी तहसीलदार प्रमोद हिलेंच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. (Villagers sick due to Krishna Enzotech Nandesar Badapur villagers on hunger strike from Monday Nashik News)
सततच्या मागणीला प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जात असल्याने भाऊसाहेब शिंदे, मगन शिंदे, संकेत शिंदे, मनोज शिंदे, ज्ञानेश्वर ढोमसे, धनंजय शिंदे, प्रकाश देवडे, शरद गायकवाड, श्रावण बेंडके आदीसह १५ ते २० शेतकरी उपोषणाला बसले होते. कृष्णा एन्झोटेक कंपनीत काही घातक केमिकल्स बेदरकारपणे वापरली जात आहेत.
त्यामुळे त्वचारोग, खोकला आणि इतरही आजार पसरत असल्याने ग्रामस्थांना त्रास होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. कंपनीने खड्डा खोदून तेथे या सांडपाण्याची विल्हेवाट लावली आहे.
मात्र हे पाणी विहिरी तसेच बोरवेलमध्ये झिरपत आहेत. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात कंपनीच्या संचालकांना भेटून या रसायनिश्चित सांडपाण्याची इतरत्र विल्हेवाट लावण्याची विनंती केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
दहा वर्षानंतरही कुठलीच कारवाई झाली नसून निवेदने देऊनही आश्वासने मिळालेली आहेत. सदरची कंपनी बंद करावी, अशी मागणी करून ग्रामस्थांच्या आरोग्याला काही धोका झाल्यास याला सरकारी यंत्रणा जबाबदार राहील असे या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर भाऊसाहेब शिंदे, मगन शिंदे, धनंजय शिंदे आदीच्या सह्या आहेत.
तहसीलदार प्रमोद हिले यांनी आज आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि शेतकरी प्रतिनिधि, कंपनीच्या प्रमुख संचालक मीनल वर्मा बैठक घालून योग्य तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले. यावर समाधान झाल्याने उपोषण मागे घेतले. सहाय्यक निरीक्षक नितीन खडांगळे, हवालदार चंद्रकांत निर्मळ व ग्रामस्थ उपस्थित होते.
"आमचे सर्व उत्पादन शेतीपूरक असून, अनेकांना रोजगार मिळाला आहे. खाद्यपूरक कंपनी असल्याने केमिकल्सयुक्त उत्पादन घेतले जात नाही. आम्ही व कर्मचारी ३० वर्षांपासून कार्यरत आहे. आजपर्यंत कुणालाही कसलाही त्रास झालेला नाही. तरीही ग्रामस्थांच्या मागणीनुसार कंपनी यावर नक्की उपाययोजना करेल, फक्त थोडा वेळ मिळावा."
- मीनल वर्मा, संचालक, कृष्णा एन्झोटेक, येवला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.