tensed farmer due to grapes crisis esakal
नाशिक

Grapes Crisis: द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ; मजुरांची टंचाई

सकाळ वृत्तसेवा

Grapes Crisis: पावसाने उघडीप देताच निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांनी द्राक्षबागा वाचवण्यासाठी कंबर कसली आहे. डावणी, करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, द्राक्षघडांची व मण्यांची लांबी वाढावी, यासाठी बुरशीनाशकाची फवारणी, थिनिंग, जिबरेलिक ॲसिडचा स्प्रे आदी कामे सुरू आहेत. मात्र, कुशल मजुरांची टंचाई, अडवणुकीचे धोरण, उधारीवर औषधे मिळण्यास होणाऱ्या अडचणीमुळे द्राक्ष उत्पादक मेटाकुटीला आला आहे.

निफाड तालुका द्राक्ष उत्पादनात आघाडीवर आहे. तालुक्यात सुमारे हजारो एकर क्षेत्रात विविध जातीच्या द्राक्षबागा आहेत. द्राक्षबांगावर बदलत्या हवामानाचा लगेच दुष्परिणाम जाणवतो. (vineyards farmers are in problem due to many problems nashik agriculture news)

बागा वाचवण्यासाठी व निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेण्यासाठी ऑक्टोबर छाटणीनंतर परिस्थितीनुसार द्रवरूप खते, संप्रेरके, बुरशीनाशके, कीटकनाशके, थिनिंग करणे आदी कामे वेळापत्रकानुसार करावी लागतात.

या कामात दिरंगाई झाल्यास उत्पादन व गुणवत्तेवर परिणाम होतो. बुरशी व कीटकनाशकांची फवारणी करताना काळजी घ्यावी लागते. मशागतीसाठी कुशल मजुरांची आवश्यकता असते. यासाठी पेठ-सुरगाणा येथून दर वर्षी मजूर येतात. शेतकऱ्यांची अडचण पाहून ते वाढीव मजुरी व उचल मागतात. यामुळे शेतकऱ्यांचा नाईलाज होतो.

काहीवेळा मजूर उचल घेऊन पसार होतात. द्राक्ष खरेदीनंतर व्यापारीसुद्धा पैसे बुडवतात. नुकत्याच झालेल्या अवकाळीमुळे डावणी, करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, द्राक्ष घडांची व मण्यांची लांबी वाढावी यासाठी बुरशीनाशकाची फवारणी, थिनिंग, जिबरेलिक ॲसिडचा स्प्रे आदी कामे वेळेत करणे आवश्यक आहे. मात्र कुशल मजूर मिळत नसल्याने द्राक्ष उत्पादकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

२०१४ पासून अतिवृष्टी, गारपीट, पाणीटंचाई, खते, बुरशीनाशकांचे वाढलेले भाव, बाग उभारण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तारा, लोखंड यांच्या वाढलेल्य दरांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे द्राक्षबागच्या मशागतीसाठी लागणारा वार्षिक खर्च एक लाख रुपयांवरून चार लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

मिळणारे उत्पन्न पाहता द्राक्ष उत्पादनासाठी प्रतिकिलो ५० रुपये भांडवली खर्च येतो. प्रतिकूल हवामानामुळे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेणे शक्य न झाल्यास प्रतिकिलो २५ ते ५० रुपये बाजारभावाने द्राक्षाची विक्री करावी लागते. त्यामुळे आर्थिक कर्ज बोजा वाढतो. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचा कणाच मोडला आहे.

त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांचा कल मजुरीपासून मिळणाऱ्या शाश्वत उत्पन्नाकडे वाढला आहे. देशाला परकीय चलन मिळवून देणाऱ्या द्राक्षबागा वाचवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी होत आहे.

"अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. टोमॅटोची पडलेली भाव त्यातून शेतकरी सावरत असतानाच अवकाळी पाऊस, त्यामुळे कृषी सेवा केंद्र पावडरवाले शेतकऱ्यांना उधारीत पावडर देणे बंद केले असून, जी औषधे पाहिजे ते वेळेवर मिळत नाही. तीन वर्षापासून द्राक्षशेतीचे नुकसान होत असून, सरकारने तुटपुंजी मदत शेतकऱ्याला करण्यापेक्षा सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्याला या कठीण परिस्थितीतून बाहेर काढावे." -पंकज देशमुख, आहेरगाव

"अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान झाले असून, झालेला खर्च तर वसूल होणार नाहीच; पण बागा जगविण्यासाठी खर्च करायला कर्जसुद्धा उपलब्ध होणार नाही अशी स्थिती आहे." -राजेश चव्हाण, रेडगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT