Traffic esakal
नाशिक

Nashik : शहरातील वाहतूक सिग्नल रामभरोसे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरातील सर्वच वाहतूक सिग्नल (Traffic Signal) त्यांच्या नियमाप्रमाणे सुरू आहेत. या सिग्नलच्या नियमांची पायमल्ली मात्र बेशिस्त वाहनचालकांकडून सर्रास होत आहे. वाहतूक पोलिस सिग्नलवर असून नसल्यासारखे आहेत. मात्र, ठराविक पॉइंट मिळविण्यासाठी वाहतूक पोलिसांमध्ये ‘अर्थ’ जनिक स्पर्धा सुरू असल्याची चर्चा वाहतूक पोलिस शाखेत रोजच रंगतदार केली जाते. तर, दुसरीकडे वाहतूक सिग्नलवर पादचाऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. (violation of signal rules was rampant by unruly drivers Nashik News)

शहरातील वाहनचालकांना शिस्त लागावी, वाहतूक नियमांचे पालन व्हावे, सिग्नलच्या नियमांचे पालन व्हावे यासाठी आत्तापर्यंत नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेकडून विविध उपक्रम राबविले गेले. त्यासाठी पोलिस आयुक्तांसह वाहतूक शाखा, शहरातील सेवाभावी संस्था, शाळा-महाविद्यालयांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. मात्र, सध्याची शहरातील वाहतूक कोंडी, सिग्नलवरील बेशिस्ती, वाहतूक पोलिसांची सोईस्कर डोळेझाक आणि केवळ पॉइंट वर थांबून दंडात्मक कारवाई करण्याकडेच असणारा वाहतूक पोलिस शाखेचा कल यामुळे सर्वसामान्य नाशिककर मात्र हैराण झाला आहे. मेहेर सिग्नल, सीबीएस सिग्नल, त्र्यंबक नाका सिग्नल, गडकरी सिग्नल, द्वारका सिग्नल, टिळकवाडी सिग्नल, कॅनडा कॉर्नर सिग्नल, जुना गंगापूर नाका सिग्नल, आयटीआय सिग्नल, एबीबी सिग्नल, सिटी सेंटर मॉल सिग्नल, त्रिमूर्ती चौक सिग्नल, उपनगर सिग्नल, दत्तमंदिर चौक सिग्नल हे शहरातील महत्त्वाच्या सिग्नल्स आहेत.

परंतु, यापैकी एकाही सिग्नलवर वाहतूक पोलिस गेल्या कित्येक दिवसांपासून कर्तव्य बजावताना दिसत नाही. ठराविक वेळेपुरता या सिग्नलवर वाहतूक पोलिस असतात, परंतु ते विनाहेल्मेट कारवाईवर लक्ष केंद्रित करतात. मात्र, कोणीही सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करताना दिसत नाहीत. झेब्रा क्रॉसिंगवर वाहने थांबतात. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना आपला जीव मुठीत धरावा लागतो. मात्र याकडे वाहतूक पोलिसांकडून सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे.

स्मार्ट रोडवर नित्याची कोंडी

स्मार्ट रोडवरील त्र्यंबक नाका, सीबीएस सिग्नल, मेहेर सिग्नल या तीनही ठिकाणी सकाळ- सायंकाळ वाहतूक कोंडी असते. बहुतांशी सिग्नलचे पालन होत नाही. मेहेर सिग्नलवर तर चुकीच्या दिशेने वाहने चालविली जातात, तरीही वाहतूक पोलिस कोणतीही कारवाई करीत नाही. मेहेर, सीबीएस सिग्नलजवळच अनधिकृतरीत्या रिक्षाथांबे तयार झाले असून, त्यामुळे वाहतूक कोंडी होऊनही त्या रिक्षाचालकांवर कोणतीही कारवाई होत नाही. अर्थ नियोजनासाठी सोयीचे वाहतूक पोलिस शाखेत सध्या ‘पॉइंट’ ची चर्चा अधिकच खमंगपणे होते आहे. शहरातील काही पॉइंट हे वाहतूक पोलिसांसाठी अर्थ नियोजनासाठी सोयीचे मानले जातात. असे पॉइंट मिळावे यासाठी वाहतूक पोलिस आग्रही असतात. त्यासाठी वेगळेच अर्थकारणही वाहतूक शाखेत चालते अशीही चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT