चांदोरी (जि. नाशिक) : कोरोनाची लाट सक्रिय होण्यापूर्वीच टीव्ही चॅनेल, सोशल मीडियावर अफवाने अक्षरशः धुमाकूळ घातल्याने ग्रामीण भागात यावर एकच चर्चा सुरू झाली आहे. (Viral Lockdown Rumors Social media is full of corona fever and rumors nashik news)
कोरोनाच्या नवीन बीएफ.७ विषाणूमुळे चीनमध्ये रुग्णसंख्येची त्सुनामी आली असून, राजधानी बीजिंगमध्येही या साथीने शिखर गाठले आहे. इतर शहरांचीही साथीच्या विस्फोटाच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू आहे अशा आशयाच्या वृत्तांनंतर चीन सरकारने कोरोना बाधितांची सरकारी आकडेवारी जाहीर न करण्याचा निर्णय घेतला.
सर्वच वातावरण संशयित होत चालले आहे. मात्र, देशातील टीव्ही व सोशल मीडियावर चीनमधील खरी-खोटी भयावह स्थिती दाखविण्याची स्पर्धा त्यांच्यात सुरू आहे. तालुक्यातील खेडोपाड्यांत, चौकाचौकांत, अनेक जण कोरोना तसेच लॉकडाऊनसंदर्भात आपापले ठोकताळे सांगून कोरोनावर चर्चा करीत आहेत.
काही विघ्नसंतोषी मंडळी कोरोना व लॉकडाऊनचे भांडवल करून ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरविण्याचे काम करीत आहेत. खोट्या अफवा पसरवून सार्वजनिक जीवनातील वातावरण खराब करीत आहेत. अशा लोकांवर पोलिस प्रशासनाने वेळीच कारवाई केली. अफवा पसरविणाऱ्याच्या मनात दहशत निर्माण होईल व सर्वसामान्य जनतेला खरे काय आहे, तेच समजेल.
"चिनी लोकांपेक्षा भारतातील लोकांची प्रतिकारशक्ती अधिक चांगली असून, पूर्वीचा अनुभवही अनेकांच्या गाठीशी असल्यामुळे सर्वजण कोरोनाच्या या नवीन विषाणूचा मुकाबला करू शकतात. त्यामुळे काळजी करण्याचे काहीच कारण नाही. फक्त प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक नियमांचे जास्तीत जास्त पालन करावे." - डॉ. प्रल्हाद डेर्ले, माऊली हॉस्पिटल, चांदोरी.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.