SP Sachin Patil with farmers at Chandori esakal
नाशिक

पोलीस अधीक्षकांच्या भेटीने, शेतकरी सुखावला

सागर आहेर

चांदोरी (जि. नाशिक) : शेती अन त्यावरील अस्मानी संकटे शेतकऱ्यांना (Farmers) नवीन नाही,असंच एक संकट येत अन शेतीचं मोठं नुकसान करून जातं,निराशा घेऊन तरुण पुणे गाठतो,विद्येच्या माहेरघरात घट्ट पाय रोवत रात्र दिवस मेहनत घेतो,सनदी लेखापाल होतो आणखी मेहनत घेतो पुढे जाऊन आयपीएस (IPS) होतो अन नाशिकच्या शेतकऱ्यांच्या मनात शेतीशी नाळ असलेला अधिकारी म्हणून कायमचं घर करतो,अशा शेती, मातीशी नाळ घट्ट ठेवणाऱ्या सचिन पाटील (SP Sachin Patil) यांचा अनुभव घेतलाय चांदोरीगावातील शेतकऱ्याने.

नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक कामानिमित्त ग्रामीण भागांतील निफाड दौऱ्यावर असताना त्यांना चांदोरी गावाच्या शिवारात त्यांना शेतात नांगर चालवत असलेला शेतकरी दिसला. त्यांनी गाडी थांबवून त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्याची विचारपूस केल्याने शेतकरी मनोमनी भारावला.

पोलीस अधीक्षक सचिन पाटील कामानिमित्त ग्रामीण भागांतील निफाड दौऱ्यावर असताना त्यांना चांदोरी गावाच्या शिवारात नागापूर फाट्या नजीक शेतात नांगर चालवत असलेला शेतकरी त्यांना दिसला.मातीशी नाळ जोडलेली असल्याने शेतकरी पुत्र सचिन पाटील यांनी आपली गाडी थांबवून नांगर चालवत असलेल्या ठिकाणी ढेकळ तुडवत मशागतीत व्यस्त असलेल्या शेतकऱ्याच्या भेटीला गेले.त्याची आपुलकीने आस्थेवाईकपणे चौकशी केली.शेतकऱ्याचे नाव,गट नंबर, शेतीची मशागत,बी बियाणे,औषधी, खते व पावसाबाबत विचारपूस केली. थोडावेळ आपलेसे वाटले एवढा मोठा साहेब आपल्या शेतात येऊन आपली चौकशी व शेती कामाबद्दल विचारणा केल्यामुळे शेतकरी गणेश एकनाथ खेलुकर आनंदाने भारावले. आपल्या सारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतात खुद्द पोलीस अधीक्षक येऊन आपल्या अडीअडचणीची विचारपूस करतात. यामुळे या शेतकऱ्याला सुखद धक्काच बसला.या भेटीमुळे सर्वसामान्यांची काळजी घेणारे पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचे नाव जिल्ह्यात चर्चिले जात आहे.

"आज एकीकडे कृषिदिन साजरा होत असताना सर्वसामान्य शेतकरी मात्र महागाई ने त्रासलेला आहे,त्याही परिस्थिती मध्ये नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केलेली चौकशीने भारावून गेले." - गणेश खेलुकर, शेतकरी, चांदोरी

"परिस्थिती कुठलीही असो, बळीराजानं पेरायचं आणि संकटांनी त्याला घेरायचं कधी सोडलेलं नाही. अशा शेतात घाम गाळून जगाची भूक भागवणाऱ्या तमाम शेतकरी बांधवांना महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त शतशः नमन..!" - सचिन पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT