नांदगाव : जीर्ण व मोडकळीला आलेली गाववेस उतरवून घेण्याच्या कार्यवाहीला अखेर मुहूर्त मिळाला.
येत्या २ फेब्रुवारीला सकाळी पुरातन गाववेस काढून घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी व प्रशासक विवेक धांडे यांनी दिली. (Vivek Dhande statement Municipal Corporations decision to demolish Nandgaon township SAKAL Impact nashik)
नगरपालिकेतर्फे शहर हद्दीतील सिटी सर्वे क्रमांक ८९७ मधील जीर्ण व मोडकळीस आलेली जुनी वेस (बुरूज) उतरवून घेण्यात येणार असल्याने वेशीलगतच्या रहिवाशांनी घरे, दुकानांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे.
काम पूर्ण होईपर्यंत या मार्गाचा वापर न करता पर्यायी मार्गाचा वापर करीत नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असेही श्री. धांडे यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
गावाची मजबूत तटबंदीची साक्ष देणाऱ्या गाववेसीची काही दिवसांपासून पडझड होऊ लागली होती. गेल्या महिन्यात वेशीच्या उजव्या बाजूच्या बुरुजातून दगड-माती मिश्रित मलबा ढासळू लागल्याने पुरातन ठेव्याचे जतन व्हावे, यासाठी ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित केले होते.
पुरातन वेशीच्या प्रवेशद्वारावर बाभळी उगवल्याने बुरुजामधील दगडाच्या भिंतीला तडे गेल्याने बुरुजातली माती मिश्रित मलबा कोसळत होता. मलबा नगरपालिकेच्या स्वच्छतागृहाच्या छतावर पडल्याने भीषणता टाळली गेली.
गाववेस नेमकी कुणाची? नगरपालिकेची की खासगी ट्रस्टची? याचा नेमका उलगडा होत नव्हता. त्यामुळे गाववेस व लगतच्या क्षेत्रफळाची नेमकी नोंद तपासण्यात आली. त्यासंबंधीची नोंद भूमी अभिलेखाच्या नगरभूमापन क्रमांक८९७ वर आढळली.
ती नोंद ‘सरकारी टाऊन हॉल बुरूज महाराष्ट्र सरकार’ अशी असून धारणाधिकार ‘ग’ प्रमाणे गाववेस व त्याभोवतीचे ४१.९० चौरस फूट क्षेत्रफळ सरकारचे असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. त्यामुळे गाववेसीच्या डागडुजीचा मार्ग मोकळा झाला.
संपूर्ण वेस धोकादायक असेल, तर तिचे मूळ स्वरूप तसेच ठेवून रिकाम्या जागेवर अतिक्रमण होणार नाही, याची खबरदारी घेत नव्या अभियांत्रिकी रचनेत तिची उभारणी शक्य आहे अथवा नाही, याबाबत वास्तुविशारदांचे मार्गदर्शन मागविण्यात आले होते.
त्या नंतर अखेरीस ही गाववेस काढून घेण्याच्या कामाला मुहूर्त लाभला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.