voter registration sakal
नाशिक

Teacher Constituency Election : नाशिकच्या शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुकीची शाळा सुरू; मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर

संतोष विंचू

Nashik Teacher Constituency Election : मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने पुढील वर्षी मुदत संपत असलेल्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे निवडणुकीच्या दृष्टीने पहिले पाऊल पडले आहे.

यामुळे इतर निवडणुकांप्रमाणे लांबणीवर न पडता मुदतीत होईल, हे स्पष्ट झाले आहे. नावनोंदणीची ३० सप्टेंबरपासून प्रक्रिया सुरू होणार आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास पोतनीस, कोकण विभाग पदवीधरचे आमदार निरंजन डावखरे, नाशिक विभाग शिक्षक आमदार किशोर दराडे व मुंबई विभागाचे शिक्षक कपिल पाटील यांचा कार्यकाळ ७ जुलै २०२४ ला संपत आहे. (Voter Registration Program for Teachers Constituency Announced by Election Department nashik news)

त्यामुळे २०१८ प्रमाणेच आता जून २०२४ मध्ये सहा वर्षे पूर्ण होत असल्याने येथील निवडणुका मुदतीत होतील, हेही जवळपास स्पष्ट झाले आहे.

निवडणूक आयोगाने १ नोव्हेंबर २०२३ या अर्हता तारीखवर आधारित मुंबई व कोकण विभागातील पदवीधर आणि नाशिक व मुंबई विभागातील शिक्षक मतदारसंघांसाठी मतदारयाद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम आज जाहीर केला आहे. मतदार नोंदणी अधिनियमानुसार नावनोंदणीसाठी ३० सप्टेंबर २०२३ ला जाहीर सूचना प्रसिद्ध होणार असून, वर्तमानपत्रातील नोटिशीची प्रथम पुनर्प्रसिद्धी १६ व द्वितीय पुनर्प्रसिद्धी २५ ऑक्टोबरला होणार आहे.

६ नोव्हेंबर हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांक आहे. २० नोव्हेंबरला मतदारयादींची छपाई होणार असून, २३ नोव्हेंबरला प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध होणार आहेत. २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. २५ डिसेंबरला दावे व हरकती निकाली काढण्यात येणार असून, ३० डिसेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे.

पदवीधरच्या नावनोंदणीसाठी नमुना १८ व शिक्षक मतदारसाठी नमुना १९ भरावा लागतो. यामध्ये देखील सुधारणा करण्यात आल्या असून, आता आधार क्रमांक समाविष्ट करावा लागणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आयोगाच्या पत्रात पात्र कोण, हे स्पष्ट नसले तरी ५ सप्टेंबर २०१६ च्या निवडणूक आयोगाच्या निकषानुसार ही नावनोंदणी होणार आहे.

नाशिक पुन्हा सज्ज

नावनोंदणीच्या सूचनेमुळे नाशिक विभागात निवडणुकीचा बिगुल वाजल्यात जमा आहे. २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत येथील शिक्षक नेते किशोर दराडे यांनी एकतर्फी विजय संपादन केला होता. त्या वेळी पाचही जिल्ह्यातल्या गुरुजींनी या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता.

या वेळी देखील ही निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. पाच वर्षांत शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासह प्रत्येक शाळेला विविध शैक्षणिक वस्तू देऊन नावलौकिक झाल्याने स्वतः आमदार दराडे पुन्हा निवडणुकीच्या तयारीत आहेत. याशिवाय इतर शिक्षक नेते कोण रिंगणात उतरणार, याविषयी आता उत्सुकता लागली आहे.

स्थानिक स्वराज्य पुढे जाणार

मे २०२४ मध्ये नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेची मुदत संपणार आहे. आमदार नरेंद्र दराडे हे त्या वेळी या जागेवर निवडून आले आहेत. या मतदारसंघासाठी जिल्हा परिषद, पालिका व महापालिकांचे सदस्य मतदार असतात.

मात्र मुदत संपूनही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक अद्याप झालेली नसल्याने या सर्वच संस्थांवर प्रशासक आहे.

त्यामुळे मतदार कोण, हा प्रश्न असल्याने नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला मुदतवाढ मिळण्याची चिन्हे आहेत. शिक्षक मतदारसंघाची महिनाभर उशिराने निवडणूक होऊनही मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने स्थानिक स्वराज्याला चाल मिळणार, हे जवळपास स्पष्ट दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT