Nashik News : मिनी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांसाठी शुक्रवारी (ता. २८) मतदान होत आहे. तर केवळ मनमाड बाजार समितीसाठी ३० एप्रिलला मतदान होत असून, १ मेस मतमोजणी होणार आहे. (Voting for 12 market committees in district is being held on today 28 april Nashik news)
१२ बाजार समित्यांमधील २०५ जागांसाठी २९ हजार ८०९ मतदार १०६ मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावतील. शुक्रवारी मतदान झाल्यानंतर लागलीच घोटी, देवळा, कळवण, दिंडोरी आणि सिन्नर बाजार समितीची मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. लासलगाव, मालेगाव, नाशिक, येवला, चांदवड आणि पिंपळगाव बसवंत बाजार समितीची मतमोजणी शनिवारी (ता. २९) होईल. नांदगाव बाजार समितीची मतमोजणी रविवारी (ता. ३०) होणार आहे.
मुदत संपल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी अन् स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्याने होत असल्याने १४ बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये रंगत वाढली आहे. यातच तालुक्यांमधील आजी-माजी आमदारांसह खासदारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असल्याने या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बाजार समित्यांच्या रणधुमाळीत यंदा कधी नव्हे ते विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.
१४ बाजार समित्यांमधील २५२ जागांसाठी विक्रमी दोन हजार ४२० अर्ज प्राप्त झाले होते. यात सोसायटी गटात एक हजार ४६१, ग्रामपंचायत गटात ६७८, व्यापारी गटात १८३, हमाल मापारी गटातील ९८ अर्जांचा समावेश होता. छाननी प्रक्रियेनंतर दोन हजार २७७ उमेदवार रिंगणात होते. यापैकी ५९८ उमेदवारांनी माघार झाल्यानंतर २२३ जागांसाठी ५३७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. बहुतांश बाजार समित्यांमध्ये दुरंगी लढती होत आहे. सुरगाणा बाजार समितीच्या १८ जागांसाठी बिनविरोध निवडणूक पार पडलेली असून, त्यांची अधिकृत घोषणा बाकी आहे.
बाजार समिती सोसायटी ग्रामपंचायत व्यापारी हमाल मापारी मतदान केंद्र एकूण मतदान जागा
नाशिक १३२२ २०६६ बिनविरोध बिनविरोध १३ ३३८८ १५
पिंपळगाव बसवंत ९३० ६५१ ७१२ ३७४ १० २६६७ १८
घोटी ७२१ ८७६ ४९१ २३१ १२ २३१९ १८
देवळा ५१० बिनविरोध ४३७ ९६ ०३ १०४३ १०
कळवण ५०३ ७७३ ४०६ ११२ ०६ १७९४ १८
दिंडोरी ७०४ १११७ ४५९ ५० ०७ २३८० १८
चांदवड १०१३ ८३५ ३१९ १०९ ०७ २२७६ १८
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
येवला १०४८ ८३४ ४२३ ३५३ ०७ २६५८ १८
नांदगाव ६२४ ५७५ ३५५ ११२ ०६ १६६६ १८
सिन्नर १२७१ १०६८ १७१ ३५२ १६ २८६२ १८
मालेगाव १५९९ १२३२ ११२५ २६१ १२ ४२१७ १८
लासलगाव ७७९ ५७५ ५४२ ३९७ ०७ २६९० १८
मनमाड २९५ २१० १४७ १३५ ०४ ७८७ १८
११० ३० हजार ६८७ २२३
रिंगणातील उमेदवार
नांदगाव (४०), चांदवड (४४), नाशिक (४०), मनमाड (४१), कळवण (४०), पिंपळगाव बसवंत (४१), देवळा (१८), मालेगाव (४६), घोटी (४३), येवला (४८), सिन्नर (४५), दिंडोरी (४२), लासलगाव (४९)
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेत्यांनी घातले लक्ष
दरम्यान, जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकांतून विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांचे भविष्य ठरणार असल्याने या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष घातल्याचे बोलले जात आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये त्यांनी नेत्यांना ताकद दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांना ताकद दिली. त्यामुळे बाजार समित्यांची निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय बनली.
आजी -माजी आमदारांच्या प्रतिष्ठा पणाला
राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते तथा माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यंदा बाजार समितीच्या निवडणुकीत विशेष लक्ष घातले. येवला असो की लासलगाव बाजार निवडणुकीत भुजबळ थेट रिंगणात उतरले होते. येवल्यात उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे यांनी थेट भुजबळांना खुले आव्हान दिल्यामुळे येथील रंगत वाढली आहे. लासलगाव राष्ट्रवादीचेच पंढरीनाथ थोरे यांनी भाजपचे ज्ञानेश्वर जगताप यांच्या साथीने भुजबळांची कोंडी केली.
मालेगावमध्ये उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या अव्दय हिरे यांनी कडवे आवाहन उभे केल्याने पालकमंत्री दादा भुसे यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. मनमाड आणि नांदगावमध्ये शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात महाविकास आघाडीने एकजूट दाखविल्याने सहज वाटणारी लढत आमदार कांदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. नाशिकमध्ये माजी खासदार देवीदास पिंगळे यांचे एकहाती वर्चस्वाला माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी भाजपच्या मदतीने आव्हान दिले आहे.
येथे महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट-भाजपत चुरस झाली. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांच्यासमोर उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे माजी आमदार अनिल कदम, गोकुळ गिते यांनी मोठे आव्हान उभे केल्याने आमदार बनकर यांच्यासाठी ही निवडणूक आरपारची लढाई झाली आहे. सिन्नरमध्येही राष्ट्रवादीचे आमदार अॅड. माणिकराव कोकाटे यांच्यासमोर उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे, भारत कोकाटे यांनी ताकद उभी केल्याने आमदार कोकाटे यांची प्रतिष्ठ पणाला लागली आहे.
दिंडोरीत राष्ट्रवादी अंतर्गतच दोन गट दोन पॅनलमध्ये विभागले गेल्याने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची कोंडी झाली आहे. कळवणमध्ये राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार, माजी सभापती धनंजय पवार यांच्या विरोधात माजी आमदार जे. पी. गावित, माजी सभापती रवींद्र देवरे यांनी आव्हान उभे केले आहे. चांदवडमध्ये काँग्रेसचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी महाविकास आघाडीची एकजूट दाखविल्याने भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर आणि आत्माराम कुंभार्डे यांच्यासमोर आव्हान उभे राहिले आहे. देवळ्यात विरोधकांसमोर भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांचा किती निभाव लागतो, याकडे लक्ष लागले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.