unseasonal heavy rain crop damage esakal
नाशिक

Rain Crop Damage: वर्षभरानंतरही नुकसान भरपाईची प्रतीक्षाच! गत सप्टेंबरमधील नुकसानीच्या 50 कोटींची थकबाकी

सकाळ वृत्तसेवा

Rain Crop Damage : गेल्या वर्षी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची ५१ कोटी ४६ लाखांची मदत अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. गेल्या वर्षी ९० कोटींहून अधिकचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

त्यातील अनेक शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. दुसरीकडे अनेक शेतकऱ्यांच्या नुकसानीची ऑनलाईन पोर्टलवर नोंदणीही नाही. (Waiting for compensation even after year 50 crores in arrears of losses from last September nashik)

मागील सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील ५३ हजार ८९६ हेक्टर पिकाला दणका बसला. जिल्ह्यातील साधारण ९८ हजार २१० शेतकऱ्यांचे ९० कोटींचे नुकसान झाले.

नुकसानीचा हा आकडा शासकीय पंचनाम्याचा असून, प्रत्यक्षात झालेले नुकसान याहून कितीतरी पट अधिक होते. उद्या (ता. १) सप्टेंबर सुरू होत आहे. तब्बल वर्षानंतरही गेल्या वर्षीच्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

गेल्या वर्षी सप्टेंबर- ऑक्टोबरच्या अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही दिलासा मिळालेला नाही. कांदा अनुदानाचे ४५० कोटी, अतिवृष्टीचे सुमारे ९० कोटी अशी ५०० कोटींहून अधिकच्या रकमेबाबत शासनाकडे प्रस्ताव दिले गेले.

मात्र, अजूनही त्यातील ५१ कोटी ४६ लाख रुपये प्रलंबित आहे. पावसाने ओढ दिल्याने खरीप पेरण्यांची वाट लागली असताना आणि कांद्यावर निर्यात शुल्क लावल्याने शेतकरी अडचणीत आला असताना निदान थकीत रक्कम मिळाली तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तालुका शेतकरी संख्या क्षेत्र (हेक्टरमध्ये) नुकसान रुपयात

चांदवड ५८,०५४ ३६,१०४.७१ ६२ कोटी ५२ लाख

नांदगाव ३,८४३ १,७०४.३९ २३ कोटी २५ लाख

मालेगाव २८,२९२ १२,४५६.४९ १८ कोटी ३९ लाख

येवला १,३६९ १,१७७.०८ १७ कोटी ४९ लाख

निफाड १,८४९ ८४२.१३ १३ कोटी ३० लाख

कळवण १,५०९ ३६२.९२ ७८ लाख १९ हजार

इगतपुरी १,२७५ ४२४.७३ ६९ लाख ७१ हजार

सिन्नर ४९२ २७६.१५ ५३ लाख ६९ हजार

नाशिक ९५४ २४२.२२ ५३ लाख १० हजार

दिंडोरी ४८५ २७०.८३ ५० लाख ७८ हजार

सुरगाणा ८८ ३४.०९ ४ लाख ७४ हजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Candidate List: पवारांनी फिरवली भाकरी; युगेंद्र पवारांच्या नावासह 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुझे क्या पता इसे हिंदी आती है! Rishabh Pant चं ऐकून वॉशिंग्टनने चूक केली,एजाज पटेलने बाऊंड्री हाणली

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, अशी चिठ्ठी लिहुन पस्तीस वर्षीय युवकाने संपविले जीवन

Jagan Mohan Reddy: आई अन् बहिणीच्या विरोधात माजी मुख्यमंत्र्यांची कोर्टात धाव; जगनमोहन रेड्डींचं काय बिनसलं?

ENG vs PAK: १० पैकी १०! पाकिस्तानच्या फिरकीपटूंची कमाल, इंग्लंडच्या खेळाडूंनी Sajid Khanसमोर टेकले गुडघे

SCROLL FOR NEXT