Wamandada Kardak : लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्रात चळवळीतील शाहीर, कवींकडून हजारो कार्यक्रमांतून जवळपास चार हजार नवतरुण शाहीर कवींना संधी देण्यात आली.
नवकवी, शाहिरांनी शाहिरीतून, विविध उपक्रमांतून लौकिक मिळविला असून, आज होत असलेल्या वामनदादा कर्डक यांच्या १०१ वी जयंतीनिमित्त घेतलेला आढावा. (Wamandada Kardak 4000 young Shahir poets were given opportunity from thousands of programs by poets and Shayars news)
महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये नवोदित कवी, गायकांसाठी काव्यवाचन, काव्य लेखन, गीत गायनाचे उपक्रम झाले आहेत. बुलडाणा, अमरावती, मुंबई, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नाशिक शहरांमध्ये सर्वाधिक उपक्रम राबविण्यात आले आहेत.
नाशिक जिल्ह्यात संविधान शाहिरीवर काम
लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानतर्फे संविधान शाहिरी परिषदा घेण्यात आल्या. या माध्यमातून जिल्ह्यातील सहाशे नवतरुणांना संधी मिळाल्या आहेत. शाळा, महाविद्यालय, एनएसएस शिबिर, वामनदादांचे वास्तव असलेल्या गाव-खेड्यांमध्ये कार्यक्रम घेण्यात आले आहेत. कवी-शाहिरांवरच येत्या दोन वर्षांत संविधान शाहिरीवरच काम सुरू असणार आहे.
वर्षभरात राज्यात असे झाले कार्यक्रम
- दोनशे शाहिरी परिषद
- ५३० शाहिरी संमेलने
- एक हजार ७०० सामाजिक प्रबोधन गीतांचे कार्यक्रम
- १७५ गीत, कवितांचे अभिवाचन
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
घर देण्याबाबत अजूनही उदासीनता
वामनदादा कर्डक यांना महाराष्ट्र शासनाने देऊ केलेली सदनिका आजतागायत त्यांच्या वारसांना मिळालेली नाही. आवश्यक असलेल्या सर्व तरतुदी व शासकीय नजराणा वारसांकडून भरण्यात आला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही, मागणी होऊनही शासन वारसांना सदनिका देण्याबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे.
शताब्दीनिमित्तही उपेक्षाच
लोककला विद्यापीठाची स्थापना, वामनदादा कर्डक यांचे साहित्य समग्र साहित्य स्वरूपात प्रकाशित होणे, लोककवी वामनदादा कर्डक कलावंत आर्थिक विकास महामंडळाची स्थापना, वामनदादा कर्डक यांचे साहित्य शाळा, महाविद्यालय विद्यापीठ स्तरांमध्ये अभ्यासक्रमात समाविष्ट करणे, राष्ट्रीय लोककलावंत पुरस्कार सुरू करणे, देशवंडी येथील स्मारक लोककलावंत स्मारक म्हणून उभारणे, नाशिक शहरात वामनदादा कर्डक यांचे स्मारक, पूर्णाकृती पुतळा उभारणे आदी मागण्या शताब्दीनिमित्त करण्यात आल्या. परंतु यातील एकही मागणी पूर्ण होऊ शकली नाही.
"बुलडाण्यात गीत सुवर्ण महोत्सव घेण्यात आला. वीस फूट उंचीचा स्मृतिस्तंभ उभारण्यात आला आहे. बुलडाणा हुतात्मा स्मारकात पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. वानमदादांच्या साहित्याची नाणेतुला करून विविध उपक्रम राबविण्यात आले."- शाहीर डी. आर. इंगळे, बुलडाणा
"वामनदादा कर्डक, प्रतापसिंह बोदडे यांचा सहवास लाभल्याने शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव पडला. वामनदादांचे गीत गाऊनच कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असून, शताब्दीनिमित्त विविध जिल्ह्यात कार्यक्रम घेतले." -प्रकाशदीप वानखेडे, कवी, अमरावती
"नाशिक जिल्ह्यातील तालुके खेड्यापाड्यांत परिषदा, कविसंमेलन, अभिवाचन कार्यक्रम झाले. येत्या दोन वर्षांत संविधान शाहिरीवरच काम केले जाणार आहे." - शरद शेजवळ अध्यक्ष, लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.