नाशिक : महापालिकेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत शासनाने चार नगरसेवकांचा (corporators) एक प्रभाग, अशी प्रभागरचना केली होती. मात्र पुढील वर्षीच्या सुरवातीलाच रंगणाऱ्या या निवडणुकीपूर्वीच ‘भाऊ, आपले चार नगरसेवक कोणते हो?’ असा प्रश्न अनेकांपुढे उभा राहिला आहे. अर्थात याला दोष संबंधितांचा नसून निवडणुकीनंतर (election) मतदारराजाकडे सोईस्कर पाठ फिरविलेल्या नगरसेवकांचाच असल्याचे दिसून येते. (ward of four corporators)
भाऊ, आपले नगरसेवक कोणते हो?
महापालिकेची मागील पंचवार्षिक निवडणूक २०१७ मध्ये पार पडली. त्या वेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार सत्तेत होते. त्यांनी दोन जणांची वॉर्डरचना मोडीत काढत दोन पुरुष व दोन महिला, अशा चार जणांच्या प्रभागाची नवीन प्रभागरचना करण्यात आली. अर्थात, या वेळी झालेल्या निवडणुकीत नाशिककरांनी भाजपच्या पारड्यात १२२ पैकी तब्बल ६६ जागांचे दान टाकत प्रथमच एखाद्या पक्षाला महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवून दिले. अर्थात यापूर्वी एक, दोन, तीन हा प्रयोगही झाला होता. मात्र भाजपच्या दृष्टीने चार जणांचा प्रभाग या पक्षाला महापालिकेच्या इतिहासात कोणाचीही मदत न घेता सत्तेपर्यंत घेऊन गेला होता, ही त्या पक्षासाठी गेल्या पंचवार्षिकची फलनिष्पत्ती होती. मात्र, दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्टवादी अशा तीन पक्षांच्या आघाडीचे सरकार सत्तारूढ झाले. आता हे सरकार पुन्हा दोन जणांच्या वॉर्डरचनेबाबत अनुकूल असून, त्यात एक महिला व एक पुरुष, असे दोन प्रतिनिधी असल्याची शक्यता आहे. मात्र कोरोनामुळे या निवडणुका पुढे न ढकलल्यास त्या पुढील वर्षीच्या सुरवातीलाच होण्याची शक्यता आहे.
नवे-जुने नगरसेवक ‘नॉट रिचेबल’
या निवडणुकीसाठी आतापासूनच अनेकांनी तयारी सुरू केल्याचे दिसून येते. मात्र कोरोनाकाळातही अनेक नवे-जुने नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ असल्याने, तसेच चार वर्षांत त्यापैकी अनेकजण मतदारांपुढे न आल्याने अनेकांपुढे आपण निवडून दिलेले चार नगरसेवक कोणते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण निवडून आल्यानंतर त्यातील काहीजण सक्रिय, तर अनेकजण ‘नॉट रिचेबल’ असल्याने मतदारांत नगरसेवकांच्या नावांबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळेच आपण निवडून दिलेले चार नगरसेवक कोणते, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.