Shocking sight of water wastage in Mauli Lawns, Trimurti Chowk, Hanuman Chowk  esakal
नाशिक

Nashik News : सिडकोतील अनेक भागात पाण्याचा अपव्यय! पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष

मनपा पाणीपुरवठा यंत्रणेने याकडे लक्ष घालून पाण्याचा दुरुपयोग करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याची गरज आता भासू लागली आहे.

सकाळ वृत्तसेवा

सिडको : सिडको परिसरामध्ये मुकणे व गंगापूर धरणातून पाणीपुरवठा होतो. परंतु या वर्षी पाण्याचे संकट निर्माण झाले की काय म्हणून गेल्या काही महिन्यांपासून कमी प्रमाणात व कमी दाबाने पाणीपुरवठा येथे होत आहे.

त्यामुळे काही ठिकाणी टँकरनेदेखील नागरिक पाणी विकत घेताना दिसून येत आहे. एकीकडे दुष्काळसदृश परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र सिडकोतील काही भागात मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होताना दिसत आहे.

त्यामुळे मनपा पाणीपुरवठा यंत्रणेने याकडे लक्ष घालून पाण्याचा दुरुपयोग करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याची गरज आता भासू लागली आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. (Waste of water in many areas of CIDCO Neglect of water supply department Nashik News)

सिडकोतील बहुतांश भागांमध्ये जुन्या पाइपलाइन आहेत, त्या बदलण्यात आलेल्या नाहीत. पाईपलाईनमधून असंख्य नळजोडणी करण्यात आले आहेत. तर नवीन वसाहत व इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा करावा लागत आहे.

हॉटेल व नवीन बांधकामासाठी जास्तीचे पाणी लागत आहे. वर्षानुवर्षे पाण्याची मागणी वाढ होत आहे. त्यामुळे पूर्वी २४ तास मिळणारे प्राणी आता दोन वेळेवरून एका वेळेवर आले आहे.

त्यातही कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे उंची इमारतीमधील शेवटच्या फ्लॅटपर्यंत पाणी पोचणे अशक्यप्राय गोष्ट झाली आहे.

त्यामुळे येथे पाण्याची वणवण नेहमीच जाणवते. आंदोलन, मोर्चे, निवेदन व असंख्य तक्रारी करूनही पाण्याची समस्या मात्र जैसे थे असल्याचे दिसून येत आहे.

मनपा अधिकारी, कर्मचारी व वॉल मॅन मात्र नागरिकांचे फोन उचलत नाही. अशीच काहीशी विदारक व बिकट अवस्था दिवसेंदिवस बघायला मिळत आहे. कधी, कधी तर धरणात मुबलक पाणी असूनही टाकीत पाणी येत नाही.

तर टाकीत पाणी असतानाही कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना मात्र पाणी मिळत नाही. अशा वेगवेगळ्या समस्यांना नेहमीच सामोरे जावे लागत आहे. पाणीपट्टी मात्र हमखास घेतली जाते.

नाहीतर ती वसूल केली जाते. त्यावर दंडात्मक कारवाई करून वेळप्रसंगी नळ जोडणी बंद करण्यात येते. साहजिकच नागरिक या संदर्भात संतप्त असल्याचे दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT