Nashik News : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. यंदा जिल्हयात खरीप हंगामाकरिता ६.२७ लक्ष हेक्टर क्षेत्रावर पेरणीचा लक्षांक निश्चित करण्यात आला आहे.
खरीप हंगामासाठी खते व बियाणे यांची मागणी शासनाकडे नोंदविली असून खतांचे आवंटन देखील जिल्ह्यास प्राप्त झाले आहे.
बोगस खते व बियाण्यांची विक्री होऊ नये यासाठी १६ भरारी पथकांची नियुक्ती केली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी मयूरी झोरे यांनी दिली. (Watch by 16 Bharari Teams by Agriculture Department Will keep an eye on seeds Bogus Fertilizers Nashik News)
गतवर्षी खरीप हंगामासाठी ६. ४१ लाख हेक्टर क्षेत्र निश्चित केले होते, यंदा ६.२७ हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी निश्चित कऱण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी युरिया, डीएपी, एमओपी व संयुक्त खतांची २.६० लाख मेट्रीक टनाची मागणी नोंदविण्यात आली होती.
यापैकी शासनाकडून २.३३ मेट्रीक टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. यात युरिया ८९ हजार १७० मे. टन आहे. १५ मे अखेर विविध खत उत्पादक कंपन्यांनी जिल्हयात २५ हजार मे.टन खतांचा पुरवठा केला आहे.
तसेच शेतक-यांना विविध कृषी निविष्ठा या दर्जेदार व योग्य दराने शेतक-यांच्या मागणीनुसार मिळण्याकरिता जिल्हास्तरावर एक व प्रत्येक तालुकास्तरावर एक असे एकूण १६ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. खरीप हंगामात पेरणीसाठी विविध पिकांचे एकूण १.०१ लाख क्विंटल बियाण्याची मागणी नोंदविण्यात आली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
इतर खतांची सक्ती नको
शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या कृषी निविष्ठांव्यतिरिक्त इतर जैविक खते व विद्राव्य खते यांची खरेदीबाबत कोणतीही सक्ती कृषी विक्री केंद्र व खत कंपन्या यांच्याकडून करण्यात येऊ नये असे आवाहन कृषी विकास अधिकारी यांनी जिल्ह्यातील कृषी निविष्ठा परवानाधारक व कंपनी प्रतिनिधी यांना केले आहे.
तसे निदर्शनास आल्यास त्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
निविष्ठा खरेदीवेळी ही घ्या काळजी
गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच निविष्ठा खरेदी कराव्यात. बनावट / भेसळयुक्त निविष्ठा खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडून पावतीसह खरेदी कराव्यात. निविष्ठा खरेदी करताना सील अथवा मोहरबंद पाकिटे / पिशव्या / बाटल्या असल्याची खात्री करावी.
उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरील अंतिम मुदत पाहावी. कमी वजनाच्या निविष्ठा व छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री करणे हा गुन्हा आहे. यासाठी कृषी विभाग व वजने मापे निरीक्षकाकडे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी मयूरी झोरे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.