Reservoir in Ozarkhed Dam. In the second photo, tomato plants are ready for planting at Khoripada esakal
नाशिक

Nashik Water Crisis: गतवर्षी ओव्हरफ्लो, यंदा अत्यल्प साठा; पालखेड 35 टक्के, तिसगाव कोरडेठाकच!

दिगंबर पाटोळे

Nashik Water Crisis : दिंडोरी तालुक्यात असलेल्या सहाही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही जोरदार पाऊस नसल्याने मागील वर्षी १७ जुलैला २०२२ ला ९६ टक्के भरलेली धरणांमध्ये पालखेड धरण (३५ टक्के) वगळता तिसगाव धरण कोरडेठाक तर चार धरणांमध्ये अवघा सरासरी वीस टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.

दरम्यान पेरण्यांसाठी रिमझिम स्वरूपात पाऊस होत असल्याने पहिल्या टप्प्यातील जवळपास ७० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहे. (Water Crisis Overflow last year low storage this year Palkhed 35 percent Tisgaon dam dry Nashik news)

जून महिन्यात तालुक्यात तुरळक स्वरूपात झालेला पाऊस वगळता संपूर्ण महिना कोरडाठाक गेला. गेल्या दहा बारा दिवसांत एक- दोन दिवस बऱ्यापैकी झालेला पाऊस व अधूनमधून रिमझिम स्वरूपात होत असल्याने तालुक्यात पेरण्या सुरु झाल्या आहेत.

सोयाबीन, मका, उडीद, मूग यांच्यासह लाल कांदा, टॉमेटो, भात, भाजीपाल्याची लागवड करण्यात आलेली आहे. रिमझीम व उघडझाप यामुळे पेरणी केलेल्या बियाण्यांना योग्य वापसा मिळत असल्याने सोयाबिन, टॉमेटोची रोपे, कडधान्या यांची उगवण क्षमता चांगली असल्याचे खोरीफाटा येथील शेतकरी सम्राट राऊत यांनी सांगितले.

भाताची रोपेही चांगल्या प्रकारे उतरली असून दहा बारा दिवसांत लागवडीयोग्य पाऊस झाल्यास भाताची लावणी सुरु होणार असल्याचे पिंगळवाडी येथील पंडित भरसट यांनी सांगितले आहे.

पेरलेल्या पिकांतील अंतर्गत मशागतीच्या कामांची तसेच टॉमेटो लागवडीसाठी ठिकठिकाणी प्लॅस्टिक पेपर टाकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे.

ठराविक काही भाग वगळता आतापर्यंत तालुक्यात दमदार पाऊस न झाल्याने तालुक्यातील नदी नाले प्रवाहित झालेले नाहीत. दुसरीकडे शेतातील विहिरीत अद्याप पाणी न उतरल्याने विहिरीचा तळ उघडाच आहे.

तालुक्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस न झाल्याने पाणीसाठ्यातही अपेक्षित वाढ झालेली नाही. मागील वर्षी १७ जुलै २०२२ पर्यंत वाघाड, ओझरखेड, तिसगाव ही धरणे शंभर टक्के भरली गेली होती.

बाकी धरणेही ९० टक्केहून अधिक भरली गेलेली होती. तालुक्यातील ६९५.९० मीमी. वार्षिक सरासरी पर्जन्यमानापैकी १ जून ते १७ जुलै २०२३ अखेर ३३७.३ मि.मी (४१.३ टक्के) पाऊस झाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यात १ जून ते ३० जून २०२३ अखेर तालुक्यात अवघा ७४.२ मि.मी. पाऊस झाला आहे. १ जुलै ते १७ जुलै या १७ दिवसांत १९७.१ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे तालुक्यातील तिसगाव धरण अद्यापपर्यंत कोरडेच असून पालखेड धरणात मे महिन्यात करंजवण धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे धरणात ३५ टक्के पाणीसाठा आहे.

बाकी धरणांमध्ये सरासरी २० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

धरणातील उपयुक्त जलसाठा (१२ जुलै)

पालखेड २२७ (३५)

करंजवण १२६२ (२३)

वाघाड ३७४ (१६),

ओझरखेड ५३५ (२५),

पुणेगाव ११२ (१८),

तिसगाव ० (०)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT